CM Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यात अवैध धंद्यांविरुद्ध बुलडोजर कारवाई ; स्थानिक शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचा विरोध…
•कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाच्या आयुक्त यांच्याकडून बेकायदेशीर टपऱ्या विरोधात बुलडोजर कारवाई
कल्याण :- पुण्यातील एकापाठोपाठ एक घडलेल्या घटना अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पुण्यासह राज्यातील बेकायदेशीर अवैध धंद्याच्या विरोधात कारवाईचा बडगा उभारला आहे. बेकायदेशीर रित्या अवैध धंदे करणाऱ्या तसेच बेकायदेशी टपऱ्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बुलडोझर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडुन कल्याण पश्चिमेच्या परिसरात आज बेकायदेशीर रित्या टपऱ्यांवर आयुक्तांच्या आदेशाने बुलडोजर चालवण्यात आला आहे. कल्याणच्या प्रसिद्ध असलेल्या बिर्ला कॉलेज परिसरात बेकायदेशीर टपऱ्यांविरुद्ध बुलडोझर चालवत असताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या छाया वाघमारे यांनी या कारवाईला विरोध केला आहे.
केडीएमसीचे आयुक्त इंदूराणी जाखड, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेत शहरात किती बेकायदा ढाबे, बार याची माहिती घेण्यात आली. त्यानुसार आजपासून या कारवाईला सुरुवात झाली असल्याची माहिती आयुक्त जाखड यांनी दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या कारवाईला विरोध..
कारवाईस दुकानदारांनी विरोध केला. तरी देखील विरोध न जुमानता ही कारवाई करण्यात आली. कारवाईबाबत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी छाया वाघमारे यांनी विरोध केला आहे. कारवाईबाबत बोलताना वाघमारे यांनी बिर्ला कॉलेज परिसरातील टपऱ्या गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहेत. विद्यार्थ्यांसाठी आहे त्या ठिकाणी चहा, पेन, वही विकले जातात. या स्टॉल्सवरून कुठलेही अमली पदार्थ विकले जात नाही.महापालिकेने त्यांना परवाना द्यावा व ठाणे मुंबईच्या धर्तीवर स्मार्ट स्टोल्स द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र याबाबत केडीएमसी आयुक्त जाखड यांनी कोणतेही अवेध धंदे करु द्यायचे नाहीत असे मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश असल्याचे सांगितले. त्या संदर्भातील आदेश महापालिका, पोलिस आणि उत्पादन शुल्क अधिकारी वर्गास दिले आहे.
स्थानिकांकडून कारवाईचे स्वागत
गेले अनेक वर्ष अनधिकृत टपऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने सातत्याने स्थानिकांकडून या संदर्भात पालिकेला तक्रारी दिल्या होत्या परंतु पालिकेकडून कोणताही ठोस उपाययोजना केली नव्हती आजच्या कारवाईने स्थानिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. तसेच या अवैध टप-यामध्ये मोठ्या प्रमाणावर फास्ट फूड विकले जात होते. ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी दिले होते. या अन्नपदार्थामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती.तसेच हे व्यवसाय करणारे सर्व परप्रांतीय असून मोठ्या प्रमाणावर गुंडेशाही चालत होती. त्यामुळे या कारवाईने स्थानिकांचा श्वास मोकळा झाला आहे.