मुंबई

Panvel News : करंबेली जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाची दुरवस्था: शिक्षकांच्या बेजबाबदारीने आदिवासी पालक संतप्त, कारवाईच्या प्रतीक्षेत

पनवेल : रायगड जिल्हा परिषदेच्या करंबेली शाळेत शिक्षक मुलांना शिकवत नसल्याचा गंभीर आरोप करंबेली गावातील आदिवासी महिलांनी केला आहे. अशिक्षित आदिवासी महिलांनी गटशिक्षणाधिकारी, पनवेल यांच्याकडे तोंडी तक्रार नोंदवत शिक्षकांच्या निष्काळजी आणि बेजबाबदार वर्तनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिक्षकांच्या या उदासीन वृत्तीमुळे हताश झालेल्या पालकांनी आपल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी शासकीय आश्रम शाळेत पाठवण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. या प्रकरणाने शाळेच्या शैक्षणिक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक समुदायात तीव्र असंतोष पसरला आहे. आता सर्वांचे लक्ष गटविकास अधिकाऱ्यांकडे लागले आहे, की ते या शिक्षकांवर कोणती कारवाई करणार? की हा असंतोष असाच अनुत्तरित राहणार?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0