CM Eknath Shinde On Vidhan Sabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असू शकते, असे मानले जात आहे.
मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election Date तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या एक-दोन दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. मंत्रालयातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही काम करताना दिसल्याचे यावरून दिसून येते. त्यामुळे लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रविवार सुट्टीचा दिवस असूनही सामाजिक न्याय विभागाने सात शासन निर्णय जारी केले. सोमवारी (14 ऑक्टोबर) एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असू शकते, असे मानले जात आहे. आज होणारी मंत्रिमंडळाची ही बैठक 11 वाजता होणार असून, त्यावर मोठ्या प्रमाणावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख असलेले राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राज्याचे राजकारण तापले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीचे नेते महायुती सरकारला कोंडीत पकडत आहेत.
विरोधकांनी एकनाथ शिंदे CM Eknath Shinde सरकारला फैलावर घेत आपल्याच पक्षातील बड्या नेत्यांचे संरक्षण करू शकत नाही, तर सर्वसामान्यांचे संरक्षण कसे करणार, असे म्हटले आहे. अशा सरकारने तातडीने राजीनामा द्यावा, असे विरोधी पक्षनेत्यांच्या वतीने सांगण्यात आले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…