CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाकरिता आशासेविकासाठी 50 महिलेचा टार्गेट महानगरपालिकेचा फतवा!
•राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते Ambadas Danve यांची टीका, “स्व कौतुक”सोहोळ्यास आशा अंगणवाडी सेविकांची पिळवणूक
छत्रपती संभाजीनगर :- आशा स्वयंसेविकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील 50 महिलांना मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना या कार्यक्रमासाठी रविवारी (6 ऑक्टोबर)रोजी सांस्कृतिक मंडळ येथे सकाळी 10.00 वाजता उपस्थित राहण्यासाठी छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेने फतवा काढत एका आशा सेविकेने कमीत कमी 50 महिलांना सोबत घेऊन आणण्याचे टार्गेट आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या या फतव्यानंतर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘स्व कौतुक’सोहळ्यात अंगणवाडीच्या आशा सेविका यांना पिळून घेण्याचे काम सध्या चालू आहे असे टीका केली आहे.
Ambadas Danve काय म्हणाले?
सनदी आणि अन्य अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मिळतो तो जनतेच्या सेवेसाठी. मुख्यमंत्र्यांच्या रविवारी होणाऱ्या ‘स्व कौतुक’ सोहोळ्यास आशा अंगणवाडी सेविकांना पिळून घेण्याचे काम आता त्यांच्या कक्षेत आले आहे. सहीपुरती शाई वापरून या अधिकाऱ्यांचे काम संपले.
मात्र, तुटपुंज्या मानधनात असंख्य कामे करणाऱ्या या आशासेविकांना प्रत्येकी 50 महिला आणण्याचे टार्गेट देणे हा त्यांच्यावर एका अर्थाने जुलूम आहे. 1500 रुपये दरमहा देऊनही महिला कार्यक्रमाला येणार नाहीत याची बहुदा खात्री झाल्याने आशा सेविकांना पिळून घेतले जात आहे. टार्गेट पूर्ण न झाल्यास त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहेच!
मुख्यमंत्र्यांच्या या रविवारच्या ‘मला पहा फुलं वाहा’ सोहोळ्यास आता एका पत्रावर शहरातील 30 स्मार्ट बस देण्यात आल्या आहेत. मग याचे बिल, त्या गाड्यांतील डिझेल हे कोण देणार? असे एका पत्रावर रुपया न घेता सामान्य माणसाला तुम्ही यापुढे अश्या बस देणार का आयुक्त जी. श्रीकांत!