CM Devendra Fadnavis News : दरडग्रस्त भागांचे मॅपिंग, लष्कर-संरक्षण दलांचा सहभाग, लोकांच्या सुरक्षेसाठी व्यापक नियोजन
मुंबई :- राज्यात येत्या काही आठवड्यांत मान्सून दाखल होणार असल्याने संभाव्य पूर, दरड कोसळण्याच्या घटना आणि इतर नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, तसेच लष्कर, नौदल, हवाई दल, कोस्ट गार्ड, NDRF, SDRF, रेल्वे, पालिका, महसूल, जलसंपदा व इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले की, “मान्सून काळात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन, सुरक्षा दल आणि स्थानिक यंत्रणांनी एकमेकांमध्ये अतिशय उत्कृष्ट समन्वय ठेवावा. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद द्यायला हवा. या काळात शनिवार-रविवार किंवा सुट्ट्यांचा विचार न करता 24×7 तातडीच्या उपाययोजनांसाठी यंत्रणा सज्ज असाव्यात.”
दरडप्रवण आणि पूरग्रस्त भागांवर विशेष लक्ष
राज्यात 249 दरडप्रवण ठिकाणांचे मॅपिंग झाले असून, त्या भागांतील नागरिकांना आगाऊ सूचना, स्थलांतर, आणि सुरक्षित निवारा यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने विशेष खबरदारी घेण्यास सांगण्यात आले.
गर्भवती महिला, वृद्ध नागरिक, आणि अपंग व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी विशेष यादी तयार करून त्यांचे आगाऊ स्थलांतर सुनिश्चित करावे, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
आपत्कालीन प्रतिसादासाठी सुरक्षा दल सज्ज
या बैठकीत लष्कर, नौदल, हवाई दल, कोस्ट गार्ड आणि NDRF/SDRF यांनी आपल्या तयारीचा आढावा दिला. सर्व दलांनी आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि वाहने तयार ठेवण्याचे आश्वासन दिले.
रेल्वे प्रशासन व महानगरपालिकांनी स्थानिक पातळीवरील ड्रेनेज सफाई, अडकलेल्या पाण्याचा निचरा, पाणी साचणाऱ्या ठिकाणांचे निवारण यासंबंधीचे नियोजन मांडले. तसेच मुंबईतील मेट्रो, रस्ते आणि इतर प्रकल्पांमुळे उद्भवणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी कामे 15 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले.
मॉक ड्रिल, डेटा शेअरिंग आणि तांत्रिक यंत्रणांचा वापर
मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक यंत्रणेला मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश दिले असून, त्यामध्ये स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा यांचा समावेश असेल. याशिवाय भूस्खलन प्रवण भागांचे अद्ययावत नकाशे हवाई दल आणि कोस्ट गार्डला पुरवले जातील, जेणेकरून हवाई बचाव कार्य अधिक प्रभावी करता येईल.
सर्व विभागांनी आपापसात डेटा शेअर करावा, एकत्रित नियंत्रण कक्ष सुरू करावा आणि आपत्ती निवारणासाठी ‘एक सरकारी चेहरा’ निर्माण करावा अशी भूमिकाही यावेळी मांडण्यात आली.
विशेष निर्देश
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…