CM Devendra Fadnavis On Maharashtra : शेतकऱ्यांना 5 वर्षे मोफत वीज देणार; गडचिरोली आता स्टील हब म्हणून विकसित होणार
मुंबई :- आज भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण करून महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सर्वांना आदरांजली वाहिली. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शौर्य दाखवणाऱ्या भारतीय सैनिकांचे कौतुक करत, त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा आणि देशाच्या प्रगतीचा गौरव केला.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत म्हटले की, या ऑपरेशनने जगाला भारताची ताकद दाखवून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत असून, आपली अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. देशात येणाऱ्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी 40% गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. तसेच, वस्तू निर्मिती, निर्यात आणि स्टार्ट-अप्समध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे, याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला.
शेतकऱ्यांसाठी फडणवीस यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षांसाठी मोफत वीज दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले. तसेच, डिसेंबर 2026 पर्यंत ‘मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प’ पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास हरित वीज मिळेल आणि हे साध्य करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…