मुंबई

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख

CM Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समितीचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील समितीमध्ये स्थान, एकनाथ शिंदे यांना मात्र समितीमधून बाहेर!

मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी राज्याच्या राजकारणात केलेला अमुलाग्र बदलानंतर आता सहकार्य पक्षी असलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मागील काही दिवसांपासून धक्क्यावर धक्के देत आहे. मुख्यमंत्री यांनी काही दिवसांपूर्वीच परिवहन महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आयएएस अधिकाऱ्याच्या निवड केल्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसला होता कारण या मंडळाचे अध्यक्षपदी मंत्री प्रताप सरनाईक इच्छुक होते. ही घटना ताजी असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्का दिला आहे. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन समिती च्या प्रमुख म्हणून देवेंद्र फडवणीस यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून अजित पवार देखील या समितीवर आहे परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या समितीमधून यांना वगळण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या योजनेवरही टांगती तलवार

मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी काही योजना घोषित केल्या होत्या. या योजना देखील आता लवकरच बंद होणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आणि शिवभोजन थाळी यांचा समावेश आहे. आनंदाचा शिधा ही योजना देखील थांबवण्याचा देवेंद्र फडणवीस सरकार विचार करत आहे. राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण वाढत असल्याने अशा योजना थांबवण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

महायुतीमध्ये नेमके काय सुरू आहे?

मुंबईमध्ये 2005 मध्ये महापूर आला होता. या महापुरानंतर आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली होती. राज्यातील आपत्तीच्या काळात ही समिती अत्यंत महत्त्वाची मानले जाते. मात्र, आता त्यातूनच एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आल्यामुळे महायुतीमध्ये नेमके काय सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0