CM Devendra Fadnavis At Gadchiroli : 12 हार्डकोर नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पण; गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
गडचिरोली – “नक्षलवाद महाराष्ट्रातून जवळपास संपला असून, आता उरलेल्या नक्षलवाद्यांनी देखील शस्त्रास्त्र खाली टाकून मुख्य प्रवाहात यावे,” असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली येथे दिला. CM Devendra Fadnavis At Gadchiroli त्यांच्या उपस्थितीत तब्बल 12 हार्डकोर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, तर एक कोटीहून अधिक बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचं शरण येणं ही नक्षल चळवळीवरील लोकांचा विश्वास उडाल्याचं लक्षण असल्याचं त्यांनी नमूद केलं.
गडचिरोलीसारखा देशातील एक महत्त्वाचा डाव्या उग्रवादग्रस्त भाग आता परिवर्तनाच्या उंबरठ्यावर असून, आत्मसमर्पण करणाऱ्यांचे नवीन जीवन सुरू होत आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “जे नक्षलवादी समर्पण करतील त्यांना शासनाच्या धोरणानुसार पुनर्वसनाची संधी मिळेल. मात्र जे अद्याप हिंसेचा मार्ग पत्करतील त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे.”
“हथियार टाकणाऱ्यांचे पुनर्वसन होणार, बाकींना कारवाईला सामोरे जावे लागेल” – मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुख्यमंत्र्यांनी यावेळी एका सामूहिक विवाह सोहळ्यातही सहभाग घेतला, जिथे 13 माजी नक्षलवादी नवजीवनाची सुरुवात करत विवाहबंधनात अडकले. “जंगलात बंदुकीसोबत हिंसक संघर्ष करणाऱ्या या तरुणांनी आता आपल्या जीवनाला नवसंजीवनी दिली आहे. ही परिवर्तनाची आशादायक दिशा आहे,” असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, छत्तीसगडमधील बीजापूर येथे 40 लाख रुपयांचा इनामी नक्षली नरसिंह चालम उर्फ सुधाकर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. त्याचप्रमाणे 21 मे रोजी माओवादी चळवळीचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ बसवराजू (वय 70) हाही नारायणपूर (बस्तर) येथे ठार करण्यात आला होता. या घडामोडींमुळे माओवादी संघटनेच्या नेतृत्वाला गंभीर हादरा बसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…