CIDCO Viral Video: सिडकोतील कर्मचाऱ्यांचा प्रताप! ऑफिसमध्येच रंगली गाण्यांची मैफील; VIDEO व्हायरल
CIDCO Employees Viral Video: बेलापूरच्या सिडकोच्या ऑफिसमध्ये कर्मचारी कामाच्या वेळेत गाणी गाताना दिसले आहेत. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल!
पनवेल जितिन शेट्टी : सिडको नैना विभागाच्या अकाउंट विभागातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. CIDCO Viral Video बेलापूरच्या सिडको विभागातील नैना कार्यालयात कामाकाजाच्या वेळेत गाण्यांची मैफिल रंगली आहे. कामाच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी गाणी गायली आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सिडकोच्या कार्यालयात सुरक्षा रक्षकांसमोरच कर्मचारी गाणी गाताना दिसत आहे. कर्मचारी माईकवर मोठ्या आवाजात गाण गाताना दिसत आहे. नैना प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका प्रकल्पग्रस्त नागरिकाने या घटनेचा व्हिडिओ काढला आहे.
कर्मचाऱ्यांनी थेट ऑफिसमध्येची गाण्यांची अंताक्षरी सुरु केली आहे. त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांचे काम वेळेवर होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे विंडोबाहेर उभे असलेल्या नागरिकांना वाट पाहावी लागते. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले दिसत आहे.
कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी हा हलगर्जीपणा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी असं टाईमपास करणे हे महाराष्ट्र नागरी सेवा कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगितले आहे.सिडको कर्मचाऱ्यांच्या या हलगर्जीपणावर सिडको काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.सिडकोच्या कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळेत हा टाईमपास करणे खूप चुकीचे आहे, असं मत नागरिकांनी मांडले आहे.