CID Additional SP Arrested | CID अपर पोलीस अधीक्षक कोल्हापुरे जेरबंद : नाशिक-पुणे महामार्गावरून घेतलं ताब्यात
CID Additional SP Arrested
कोल्हापूर/पुणे, दि. ९ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर : CID Additional SP Arrested
महाबळेश्वर येथील हॉटेल मालकाला मद्य परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून १ कोटी ५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस अधीक्षकाला नाशिक-पुणे महामार्गावरून (खटवली टोलनाका, ठाणे) रविवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे. CID Additional SP Arrested
गुन्हे अन्वेषण विभाग कोल्हापूरच्या अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या पथकाने संशयित पुणे अपर पोलीस अधीक्षक श्रीकांत नामदेव कोल्हापुरे (वय ५७) याला ताब्यात घेतले आहे.
कोल्हापुरे यांना वाई न्यायालयात हजर केले असता कोर्टाकडून त्यांना ५ दिवसांची पोलीस कस्टडी ठोठावण्यात आली आहे.
फसवणुकीच्या गुन्ह्यात यापूर्वी कोल्हापूर गुन्हे अन्वेषण पथकाने संशयित कोल्हापुरे याचे साथीदार हनुमंत विष्णुदास मुंडे, अभिमन्यू रामदास देडगे, बाळू बाबासाहेब पुरी यांना अटक केली होती. कोल्हापुरे याच्यावरील कारवाईने अटक झालेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे.
पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सांगितले की, महाबळेश्वर येथील मेघदूत हॉटेलचे मालक हेमंत साळवी यांना दारू विक्रीचा परवाना मिळवून देतो, असे सांगून मुख्य संशयित हनुमंत मुंडे, श्रीकांत कोल्हापुरे व अन्य संशयितांनी दोन कोटी 50 लाखांची मागणी केली होती. त्यापैकी साळवी यांच्याकडून एक कोटी पाच लाख रुपये वेळोवेळी रोखीने व धनादेशद्वारे वसूल केले. एक कोटीहून अधिक रक्कम घेऊनही दारू विक्रीचा परवाना मिळवून देण्यास संशयितांनी टाळाटाळ सुरू केली. हॉटेल व्यावसायिकाची भेट घेण्यास अथवा सपर्क साधण्यासही टाळाटाळ झाल्याने साळवी यांनी जुलै 2024 मध्ये कोल्हापूरे, मुंडेसह अन्य संशयितांविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.