Mumbai Chunabhatti Police Latest News : गडचच्या कडेला आढळले बाळ; तातडीच्या उपचारांमुळे प्रकृती स्थिर,वैयक्तिक अडचणींमुळे कृत्य केल्याची मातेची कबुली; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
मुंबई :- चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या Chunabhatti Police Station हद्दीत गडचच्या कडेला उघड्यावर टाकलेले नवजात बालक (शनिवार, 11 ऑक्टोबर) आढळून आले. मात्र, चुनाभट्टी पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 30 मिनिटांच्या आत अर्भकाला उघड्यावर सोडणाऱ्या संशयित मातेला ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. Mumbai Latest Crime News
पोलिसांनी वाचवला जीव
नवजात बालक उघड्यावर असल्याचा संदेश मिळताच, चुनाभट्टी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या अर्भकाला ताब्यात घेतले आणि त्याला तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या तातडीच्या उपचारामुळे सध्या नवजात बालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
30 मिनिटांत गुन्ह्याचा छडा
या संवेदनशील घटनेनंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यांनी तांत्रिक तपास आणि विचारपूस तंत्राचा योग्य वापर करत अर्ध्या तासाच्या आतच संशयित महिलेचा शोध घेतला आणि तिला ताब्यात घेतले.पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत सदर महिलेने आपल्या वैयक्तिक अडचणींमुळे हे कृत्य केल्याचे मान्य केले आहे. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अपर पोलीस आयुक्त महेश पाटील आणि पोलीस उप आयुक्त समीर शेख यांच्यासह पोलीस निरीक्षक मृत्यूंजय हिंरमठ यांच्या पथकाचे कौतुक होत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…