क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Chunabhatti Police News : चुनाभट्टी पोलिसांचा मोठा धडाका – १८३ चोरीचे मोबाईल हस्तगत, आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद!

Mumbai Latest Robbery News : मुंबईत मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करत चुनाभट्टी पोलिसांनी भल्याभल्यांना हादरवून सोडणारी कामगिरी केली आहे.

गुन्ह्याची सुरुवात

३० ऑगस्ट २०२५ रोजी एका फिर्यादीचा ३५,००० रुपये किमतीचा आयफोन बसस्टॉपवरून चोरीला गेला.
त्यावरून चुनाभट्टी पोलीस ठाण्यात Chunabhatti Police कलम ३०३(२), ३(५) भा.न्या.सं. २०२३ अन्वये गुन्हा दाखल झाला.

पोलिसांचा सापळा

परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले.

तांत्रिक तपास, गुप्त बातमीदारांची मदत आणि कौशल्यपूर्ण चौकशी करून पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेतला.

जेरबंद आरोपी

पोलिसांनी आजवर ८ आरोपींना अटक केली असून त्यात –
मुंबई–नवी मुंबईतून:

सचिन लक्ष्मण गायकवाड

तीसिफ आयुष सिद्दीकी

अमर गिरीलाल शंकर

निसार असिक हुसेन आलम

सादिक अली मनुद्दीन शेख

मुर्शीद मन्सूर सिद्दीकी

कोलकत्त्यातून:

प्रदीप विश्वनाथ गुप्ता

अझिझुर अनिसुर रहमान

यांचा समावेश आहे.

आरोपींकडून ३०,४८,०१०/- रुपये किमतीचे एकूण १८३ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय कनेक्शन

या प्रकरणात आणखी ६ आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यात काही बांगलादेशी गुन्हेगारांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्व फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही जेरबंद केले जाईल.

उल्लेखनीय कामगिरी

ही यशस्वी कारवाई झाली –

पोलीस आयुक्त देवेन भारती

पोलीस सह आयुक्त (का.व.सु.) सत्यनारायण चौधरी

अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग डॉ. महेश पाटील

यांच्या मार्गदर्शनाखाली,
परिमंडळ ६ चे उपायुक्त समीर शेख,
नेहरूनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मृत्युंजय हिरेमठ,
चुनाभट्टी ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशा जाधव
आणि विशेष पथकातील अधिकार्‍यांनी ही धडाकेबाज कारवाई केली.

मोबाईल चोरी करून देशाबाहेर विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला जेरबंद करून चुनाभट्टी पोलिसांनी मुंबईत पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या काळजात धडकी भरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0