चिऊ मला माफ कर… लेकराची काळजी घे… धीट रहा.. चिट्टी लिहून मराठा आंदोलकाची आत्महत्या
•Maratha Reservation Activist Suicide मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे याकरिता बार्शी तालुक्यातील एका तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे
पुणे :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे Maratha Reservation Activist Suicide यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक तरुणांनी ज्येष्ठांनी आत्महत्या केले आहे. या आत्महत्या रोखण्याकरिता मराठा आंदोलन जरांगे पाटील तसेच राज्य सरकारकडून सातत्याने आवाहन करत असताना पुन्हा एकदा मराठा आंदोलकांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या प्रसाद देठे हे मूळचे बार्शीतले असं राहणारे असून सध्या ते नोकरी करिता पुण्यात होते. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी आत्महत्या केली आहे. आत्महत्या पूर्वीच त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली या चिठ्ठीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे याकरिता सर्व ओबीसी नेत्यांना विनंती केली आहे. तसेच चिऊ मला माफ कर.. असा उद्गार करत आत्महत्या केली आहे.
प्रसाद देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे. लिहिलेल्या चिठ्ठीत ‘फक्त मराठा आरक्षण मिळावे’, याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाल्यानंतर प्रसाद देठे हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते. ते सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्याने पोस्ट टाकायचे. त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करुन मराठा आरक्षणाची भूमिका हिरीरिने मांडली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. जरांगे पाटील जिंदाबाद लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे , आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आत्महत्या पूर्वी चिठ्ठी..
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे.
जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा.मला माफ करा.
तुमचाच प्रसाद