मुंबई

Chitra Wagh : भाजप नेत्या चित्रा वाघ यांची न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया..

Court slams Chitra Wagh in Pooja Chavan suicide case : संजय राठोड याचिकेवर सुनावणी दरम्यान चित्रा वाघ यांना न्यायालयाकडून खडेबोल सुनावले

मुंबई :- महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड Sanjay Rathod यांच्यावर पूजा चव्हाण Pooja Chavan आत्महत्या प्रकरणी भाजपनेच्या चित्रा वाघ Chitra Wagh यांनी याचिका दाखल केली होती. परंतु शिवसेना बंडा नंतर शिंदे यांनी फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी करत महायुतीचे सरकार स्थापन केले होते.शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी याचिका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने केलेल्या टिप्पणीवरुन चित्रा वाघ यांच्यावर टीका होत आहे. याला आता चित्रा वाघ यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. हे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरूच असून हे प्रकरण मागे घेण्याच्या सूचना आपण वकिलांना दिल्या नसल्याचे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

चित्रा वाघ यांनी एका पोस्टच्या या प्रकरणी स्पष्टिकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, ‘मंत्री संजय राठोड प्रकरणी माध्यमांमध्ये विविध बातम्या येत आहेत. सद्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. मनासारखा निकाल आला की लोकशाही जिंकली आणि निकाल विपरीत गेला की न्यायालयावर दोषारोप करणाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणे तसेही कठीण आहे. पण एक बाब याठिकाणी स्पष्ट करू इच्छिते की, मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत. न्यायालयाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो त्या प्रकरणाचा अंतिम निकाल नाही. न्यायालयात हे प्रकरण सद्या सुरू आहे आणि तेथे मेरिटवरच निर्णय होईल, हा माझा ठाम विश्वास आहे.’

आता याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. यावेळी न्यायालयाने चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावले आहेत. सुनावणीच्या वेळी कोर्टाने म्हंटले आहे की, तुमच्यासारखे अनेक राजकारणी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत आहेत. तसेच या माध्यमातून न्यायालयांना विनाकारण त्यात ओढले जात आहेत. पण, आम्ही त्याला प्रोत्साहन देणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0