Chitra wagh : अनिल देशमुख यांचा काळा बुरखा टाराटारा फाडला… भाजपा नेत्या चित्रा वाघ
Chitra wagh On Anil Deshmukh : अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करून त्यांची चौकशी करा ; आमदार प्रसाद लाडाची मागणी
मुंबई :- अनिल देशमुख Anil Deshmukh हे त्यांच्या पीएच्या माध्यमांतून पैसे घेत होते असा आरोप सचिन वाझे Sachin Waze यांनी केला आहे. मी त्यांच्या पीएकडे पैसे देत होतो या बद्दल सर्व माहिती मी फडणवीसांना Devendra Fadnavis पत्र लिहून दिली असे वाझे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याने आता मोठी खळबळ उडाली आहे. वाझे यांचे हे पत्र अद्याप समोर आलेली नाही. मात्र एएनआय वृत्तसंस्थेशी बोलतांना त्यांनी माझ्याकडे अनिल देशमुख यांच्या विरोधात पुरावे असल्याचा आरोप केला आहे. या सर्व प्रकरणावर भाजपाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख यांच्या काळा बुरखा टराटरा पडला आहे. तर, विधान परिषदेचे आमदार भाजप नेते प्रसाद लाड Prasad Lad यांनी अनिल देशमुख यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते, असे सचिन वाझेने सांगून टाकले आहे. याचे पुरावे गृहखात्याकडे त्यांनी दिल्याचे आणि तसे पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे सांगितले आहे, असे म्हणत भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मविआवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
दरम्यान चित्रा वाघ पुढे बोलताना म्हणाल्या की, सचिन वाझेंनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.
अनिल देशमुखांचा जामीन रद्द करून त्यांची चौकशी करा. सचिन वाझेंना तत्कलीन गृहमंत्र्यांचेच आशीर्वाद होते असा आरोप करत देशमुखांच्या चौकशीची मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. तसेच एसआयटी नेमून वाझेंच्याही चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमांतून पैसे घेत होते असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. मी त्यांच्या पीएकडे पैसे देत होतो या बद्दल सर्व माहिती मी फडणवीसांना पत्र लिहून दिली असे वाझे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याने आता मोठी खळबळ उडाली आहे. यावरूनच प्रसाद लाड यांनी भाष्य केले आहे.
सचिन वाझेंना तत्कलीन गृहमंत्र्यांचेच आशीर्वाद होते प्रसाद लाड म्हणाले, “आज ज्या पद्धतीने सचिन वाझेंनी पुन्हा एकदा आरोप केले आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते हा अतिशय गंभीर आरोप आहे. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी त्यांनी पेनड्राइव्ह बॉम्ब टाकून जे आरोप केले होते त्याच आरोपांचा पुनरुच्चार हा सचिन वाझेंनी केला आहे. 100 कोटी वसुली प्रकरण, डान्स बारचे पैसे, मनसुख हिरेंची हत्या, अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्याचे काम असे सर्व कृत्य सचिन वाझेंनी केले होते. त्यावेळी वाझेंना जर कोणाचा आशीर्वाद असेल तो तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचाच होता”, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.