Ulhasnagar Breaking News : शिक्षिकेने तीन वर्षांच्या मुलाला कानशिलात लगावल्याने संताप, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे आक्रमक
उल्हासनगर :- उल्हासनगरमधील एका खासगी बालवाडीत तीन वर्षांच्या चिमुकल्याला महिला शिक्षिकेने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर शहरात एकच संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सोमवारी मनसे कार्यकर्त्यांनी या बालवाडीवर धडक देऊन तोडफोड केली.
नेमकं काय घडलं?
काही दिवसांपूर्वी एका खासगी बालवाडीतील व्हिडिओ समोर आला होता. त्यात एक महिला शिक्षिका एका चिमुकल्याला कविता शिकवताना दिसत आहे. कविता बोलताना टाळी वाजवण्यास सांगत असताना, तो चिमुकला टाळी वाजवत नसल्याने त्या शिक्षिकेने त्याला थेट कानशिलात लगावली. या मारहाणीमुळे मुलगा घाबरून गेला, तरीही शिक्षिका त्याला पुन्हा पुन्हा मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या प्रकारानंतर संबंधित शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
मनसे आक्रमक
या घटनेची माहिती मिळताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेला घेराव घातला. शाळा प्रशासनाला जाब विचारला असता, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनसे पदाधिकाऱ्यांचा संताप वाढला. त्यानंतर त्यांनी शाळेची तोडफोड केली, तसेच शाळेबाहेर लावलेले फलकही उद्ध्वस्त केले.
या घटनेनंतर मनसेने बालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसेने शाळा प्रशासनासह संबंधित शिक्षिकेवरही कठोर कारवाईची मागणी केली आहे. याव्यतिरिक्त, प्रत्येक शाळेतील शिक्षकांची नियुक्ती करताना त्यांची मानसिक पार्श्वभूमी तपासली जावी आणि त्यांचे पोलीस चारित्र पडताळणी करणे अनिवार्य करावे, अशी मागणीही मनसेने केली आहे. तसेच, प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे असावेत आणि त्याचे फुटेज पालकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…