महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “स्पा” नावाखाली चाललेल्या अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश?
•हिवाळी अधिवेशनात राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांसह गैरकृत्य करणाऱ्यांना ठणकावले, “स्पा” च्या नावाखाली होणाऱ्या सेक्स रॅकेटचा मुद्दा गाजणार?
मुंबई :- राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सध्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चांगलेच रंगले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात गैरकृत्य करणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाला त्यांना बळ देणाऱ्यांना चांगलाच दणका देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विविध मुद्दे उपस्थित करत अधिवेशनात कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेत चांगलाच रंग चढला आहे. मागील दोन दिवसांपासून राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड, परभणी आणि कल्याण येथे उपस्थित झालेल्या कायद्यावर सुव्यवस्थेच्या मुद्दा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाला चांगलाच इंगा दाखवला आहे.
बीड प्रकरणातील राजकीय वलय असलेल्या वाल्मीक कराड यांचा मुद्दा असो किंवा परभणीतील एसपी ची बदली किंवा कल्याण मधील अधिकाऱ्याचा माजुरडेपणा या सर्व मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला त्याचप्रमाणे गैरकृत्य करणाऱ्यांना एक इशारा दिला आहे. परंतु यंदाच्या अधिवेशनात राज्यातील बेकायदा चाललेल्या स्पा च्या नावाखाली सेक्स रॅकेट बाबत यंदाच्या अधिवेशनात मुद्दा उचलणार का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे सूत्र हाती घेतल्यापासून राज्यात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटकेचे आदेश दिले आहे. त्याचप्रमाणे अवैधरित्या सेक्स रॅकेट, डान्स बार यांसारख्या मुद्द्यांवरही कारवाई करण्याचे मुद्दे उपस्थित झाले पाहिजेत.
मुंबईच्या बांद्रा,खार, जुहू,अंधेरी, वर्सोवा यांसारख्या उच्चभ्रू सोसायटीत प्रदेशातील तरुणींना पैशाचे आम्हीच दाखवून कोणतेही कागदपत्र सादर न करता भारतात घुसखोरी करून यांसारख्या उच्चभ्रू परिसरातील स्पा च्या सेंटरमध्ये नोकरी मिळून देतात. या तरुणींकडून मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चे काम करून घेतले जातात. अशा अवैध देहविक्री स्पा सेंटरवर कारवाई करण्याबाबत अधिवेशनात मुद्दा उपस्थित होईल का?
(क्रमशः)