महाराष्ट्र

Devendra Fadnavis : इचलकरंजीत 700 कोटींहून अधिक विकास कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पायाभूत सुविधांपासून आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते व सामाजिक योजनांचा समावेश,इचलकरंजीचा विकास हे आमचे प्राधान्य” – मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

इचलकरंजी‌ :- इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. एकूण 700 कोटींहून अधिक निधीच्या योजनांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात पायाभूत सुविधांपासून आरोग्य व सामाजिक कल्याण योजनांपर्यंत विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

UIDSSMT योजनेअंतर्गत कबनूर व शहापूर परिसरासाठी भुयार गटार योजना व मलशुद्धीकरण केंद्रासाठी
130.60 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच नगरोत्थान अभियानाअंतर्गत 488.67 कोटी खर्चून गटार योजनेचे बळकटीकरण व विस्तार होणार आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत शहरात पाणीपुरवठा सुसज्ज करण्यासाठी 31.37 कोटींच्या कामांचा प्रारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 10 रस्त्यांचे भूमिपूजन 59 कोटींच्या निधीतून झाले. नव्याने बांधण्यात आलेल्या शहापूर पोलीस ठाण्याचे उद्घाटन 4 कोटींच्या खर्चातून करण्यात आले. सामाजिक योजनांच्या अनुषंगाने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना अंतर्गत 4200 लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे वितरित करण्यात आली, तर 5000 बांधकाम कामगारांना भांडे व साहित्याचे वाटप करण्यात आले.

याशिवाय इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे नव्याने मंजूर नर्सिंग कॉलेजचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले.
“इचलकरंजीचा सर्वांगीण विकास हे आमच्या सरकारचे प्राधान्य असून, नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या योजना महत्त्वपूर्ण ठरतील,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago