chief minister Atishi : आतिशीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, मुख्यमंत्री झाल्यानंतरची पहिली भेट
Delhi chief minister Atishi met Prime Minister Narendra Modi : मुख्यमंत्री आतिशी यांनी सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची ही पहिलीच भेट आहे.
ANI :- दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, अतिशी यांनी सोमवारी (14 ऑक्टोबर ) पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सीएम आतिशी यांची आज पंतप्रधानांशी झालेली भेट ही शिष्टाचार आहे.
आतिशी यांनी 21 सप्टेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासह त्या माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणाऱ्या त्या सर्वात तरुण महिला आहेत.आतिशी यांनी आठवे मुख्यमंत्री म्हणून एलजी विनय कुमार सक्सेना यांनी शपथ दिली.
मुख्यमंत्री झाल्यानंतर, विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा आम आदमी पार्टीला दिल्लीत पुन्हा सत्तेत आणण्याचे सर्वात मोठे आव्हान आतिशी यांच्यासमोर आहे. हे लक्षात घेऊन त्यांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जेणेकरून अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येईल.