मुंबईठाणे
Trending

Ashish Shelar : शिवतीर्थावरील चाफा बोलेना…’ आशिष शेलारांनी कवितेतून साधला ठाकरे बंधूंवर खोचक निशाणा!

Ashish Shelar On Thackeray Brother : राज-उद्धव भेटीच्या चर्चेवर भाजपची टोलेबाजी; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

मुंबई :- मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर आणि ठाकरे बंधूंवर जोरदार शब्दांत टीका केली आहे. प्रसिद्ध कवी ‘बी’ यांच्या ‘चाफा’ या कवितेचे विडंबन करत शेलारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युती किंवा जवळीकतेवर उपरोधिक टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “बंधूप्रितीची ओढ लागलेल्या भयभीत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला ही कविता अर्पण.” त्यांनी आपल्या कवितेत ‘शिवतीर्थावरील चाफा बोलेना, चाफा चालेना’ असे म्हणत राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाचा संदर्भ दिला आहे. संजय राऊत आणि अनिल परब हे जुने मतभेद विसरून मैत्रीची गाणी गात आहेत, गळ्यात गळे मिळवून फिरत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

‘येरे येरे गळ्या…’ म्हणत डिवचले
शेलारांनी कवितेत पुढे म्हटले आहे की, “चल येरे येरे गळ्या, नाचू उडू घालू फुगड्या… तरीही चाफा बोलेना, चाफा चालेना.” या ओळींमधून त्यांनी उद्धव ठाकरे गटाकडून राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी होत असलेल्या कथित प्रयत्नांवर निशाणा साधला आहे. “कितीही प्रयत्न केले तरी समोरून प्रतिसाद मिळत नाहीये,” असे सुचवत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला ‘भयभीत’ असे संबोधले आहे.

मंत्री आशिष शेलार यांचे ट्विट करून ठाकरेंना उद्देशून कविता

शिवतीर्थावरील चाफा !!

“चाफा” बोलेना चाफा चालेना… चाफा खंत करी काही केल्या फुले ना…

गेले संजय राऊत घरी…
म्हटली मैत्रीची गाणी…
आम्ही गळयांत गळे मिळवूनी रे
गेले अनिल परब सोबती…
गंध दरवळला शिवतीर्थावरी
जुने मतभेद विसरले रे
चल ये रे, ये रे गडया, नाचू उडू घालू फुगडया
खेळू झिम्मा झिम पोरी झिम पोरी झिम !

तरी ही चाफा बोले ना.. चाफा चालेना… चाफा काही केल्या फुले ना !!

(कवी बी यांची क्षमा मागून बंधूप्रितीची ओढ लागलेल्या भयभीत उबाठा सेनेला अर्पण)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0