Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराज यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची घेतली भेट, विजयानंतर छत्रपती शाहू महाराज मातोश्रीवर
Shahu Maharaj meets Uddhav Thackeray At Matoshri : छत्रपती शाहू महाराज काँग्रेस नेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
मुंबई :- कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार शाहू छत्रपती महाराज Shahu Maharaj यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांची मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांचा दीड लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव केला आहे. छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच कोल्हापुरातून निश्चितच छत्रपती शाहू महाराजांचा विजय होणार असे सांगितले जात होते.
महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शाहू महाराजांच्या सोबत काँग्रेस नेते आमदार सतेज (बंटी) पाटील आणि काँग्रेस नेते माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे याप्रसंगी उपस्थित होते. उद्धव ठाकरे सह रश्मी ठाकरे शिवसेना युवा सेनाप्रमुख नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचे सत्कार करण्यात आले तर ठाकरे परिवाराकडून शाहू महाराजांच्या अभिनंदन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी दीड लाखावर मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक Sanjay Mandlik यांचे दुसऱ्यांदा संसदेत जाण्याचे स्वप्न खंडित केले. शाहू महाराजांच्या रूपाने संसदेमध्ये छत्रपती घराण्यातील कोल्हापूर छत्रपती घराण्यातील छत्रपती घराण्याला दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व मिळाले आहे.मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र कोल्हापूर मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेऊन संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली. तर काँग्रेस पक्षाने ऐनवेळी श्रीमंत शाहू महाराज यांना रिंगणात उतरवले. काँग्रेसची ही खेळी यशस्वी झाल्याचे निकालावरून दिसत आहे.
Web Title : Shahu Maharaj : Chhatrapati Shahu Maharaj went to Matoshree and met Uddhav Thackeray, after the victory Chhatrapati Shahu Maharaj went to Matoshree