छत्रपती संभाजीनगर : लाच स्वीकारताना खुलताबाद नगरपरिषदेतील वरिष्ठ लिपीक जाळ्यात

Chatrapati Sambhaji Nagar ACB Trap : छत्रपती संभाजी नगर मधील खुलताबाद नगरपरिषदेतील वरिष्ठ लिपीकास जितेंद्र बोचरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली
छत्रपती संभाजीनगर :- खुलताबाद नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या मालमत्तेच्या नामांतर करून देण्यासाठी वरिष्ठ लिपिकाला लाच स्वीकारताना छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. Chatrapati Sambhaji Nagar ACB Arrested Bribe Person जितेंद्र रामनाथ बोचरे (39 वय ) असे वरिष्ठ लिपिकाचे नाव असून खुलताबाद नगरपरिषदेत कार्यरत आहे.
खुलताबाद नगरपालिकेच्या कार्यालय इमारतीच्या कंपाउंडमध्ये पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने वरिष्ठ लिपिक जितेंद्र रामनाथ बोचरे यांना रंगेहात पकडले आहे. तक्रारदार यांच्या मामा याचे खुलताबाद नगरपालिकेच्या हद्दीत असलेला मालमत्तेचे नामांतर करून देण्यासाठी वरिष्ठ लिपिक जितेंद्र बोचरे यांनी तक्रारदार यांच्याकडे 5000 रुपयांची लाचेची मागणी केली होती. आज (19 मार्च) लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारताना एसीबीने रंगेहात ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ लिपिक यांच्या विरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे एसीबीने सांगितले आहे.

हि कारवाई पोलीस अधीक्षक (ACB) संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक (ACB) मुकुंद आघाव, पोलीस उपअधीक्षक (ACB) सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल धस, पोलीस हवालदार युवराज हिवाळे, राजेंद्र नंदिले यांनी कारवाई करत लाचखोर लिपिकाला अटक केली आहे.