•अवैध वाळू काढून वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई न करण्यासाठी घेतली लाच
छत्रपती संभाजीनगर :- तहसील कार्यालय सिल्लोड, छत्रपती संभाजी नगर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी कारवाई करत महसूल सहाय्यकाला लाच स्वीकारल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी महसूल सहाय्यक याच्या विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यक शरद दयाराम पाटील (40 वय) यांना ताब्यात घेतल्या आहे. भारत पेट्रोल पंप, भराडी गाव तालुका सिल्लोड येथे वीस हजार रुपये स्वीकारताना एसीबीने रंगेहात ताब्यात घेतले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे ट्रॅक्टर ट्रॉली असून उपळी गावाजवळील नदी पात्रातून अवैध वाळू काढून, वाळू वाहतूक करू देऊन, तक्रार यांच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी हप्ता म्हणून महिन्याला 25 हजार लाचेची मागणी करून, त्यात तडजोड करून, तडजोडी अंती 20 हजार रुपये स्विकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले आहे. मागणी केलेली लाचेची रक्कम 20 हजार रुपये, पंचासमक्ष स्वतः स्विकारली, असता शरद पाटील (महसूल सहाय्यक) यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,राजीव तळेकर,
पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि.छ. संभाजी नगर दिलीप साबळे पोलीस उप अधिक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी-केशव दिंडे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर विजय वगरे, पोलीस निरीक्षक ,ला. प्र. वि छत्रपती संभाजीनगर सापळा पथक पोलीस हवालदार अशोक नागरगोजे, राजेंद्र सिनकर, ला. प्र. वि.छत्रपती संभाजीनगर. यांनी कारवाई केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…