क्राईम न्यूजमहाराष्ट्र
Trending

Chhatrapati Sambhajinagar Crime : वैजापुरात महिला कीर्तनकार संगीताताई महाराज यांची निर्घृण हत्या!

Chhatrapati Sambhajinagar Crime : आश्रमातच घुसून दगडाने ठेचले; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) : वैजापुरातील एका आश्रमात महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई महाराज यांची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.27) रात्रीच्या सुमारास घडली. या क्रूर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, हत्येच्या कारणाचा व मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. Chhatrapati Sambhajinagar Crime

प्राथमिक माहितीनुसार, संगीताताई महाराज आश्रमात विश्रांती घेत असताना अज्ञात इसमाने थेट आश्रमात प्रवेश करून त्यांच्यावर दगडाने सपासप वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला.

फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथक देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, ठोस पुरावे गोळा करून मारेकऱ्याच्या मागावर शोधमोहीम सुरू आहे.

सध्या ही हत्या नेमकी कोणत्या कारणाने करण्यात आली, हा वैयक्तिक राग होता की इतर कुठला सूड, याचा तपास पोलीस करत आहेत. महिला कीर्तनकारावर करण्यात आलेली ही अमानुष हत्या संपूर्ण समाजाला हादरवणारी असून, तिच्या मागे नेमकं कोण आहे, हे लवकरच उघड होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0