Chhatrapati Sambhajinagar Bribe News : एक हजारांची लाच घेताना महावितरणाचा तंत्रज्ञ जाळ्यात; एसीबीच्या पथकाची कारवाई

•ACB Action Mode On In Chhatrapati Sambhajinagar कृषिपंपासाठी सोलार पॅनल देण्याच्या कामासाठी मागितली होती लाच
छत्रपती संभाजीनगर :- कृषिपंपासाठी सोलार पॅनल देण्याच्या कामासाठी दोन हजारांच्या लाचेची मागणी करून तडजाेडीअंती एक हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.ही कारवाई आमठाणा महावितरण उपकेंद्र,सिल्लोड येथे एसीबीच्या पथकाकडून करण्यात आली आहे.याबाबत सिल्लोड ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे मौजे के-हाळा सिल्लोड येथे शेती आहे. शेतीमधील पाणी उपसा पंपासाठी शासकीय सोलार पॅनल मिळावा म्हणून अर्ज केला होता. त्या प्रक्रिये तील महावितरण कार्यालयाकडून आवश्यक्य असलेले (जिओ टॅगिंग) सोलार सर्वे करून देण्यासाठी आमठाणा महावितरण उप केंद्र कार्यालय, सिल्लोड येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या गणेश सांडू काकडे (वय 32, रा. वांगी भराडी जवळ तालुका सिल्लोड) याने हे कामासाठी दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती एक हजार फोन पे वर स्वीकारले असता एसीबीने ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय वगरे, केशव दिंडे, सापळापथक पोलीस हवालदार अशोक नागरगोजे, साईनाथ तोडकर, पोलीस अंमलदार ताटे यांच्या पथकाने केली.