•छत्रपती संभाजी नगर मधील नारायणपूर येथील पेट्रोल पंपाकरिता आवश्यक असलेले न हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितली, ही लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहाथ अटक
छत्रपती संभाजीनगर :- आपत्कालीन परिस्थितीमध्ये अतिशय मौल्यवान कामगिरी करणाऱ्या फायर ब्रिगेड अधिकाऱ्यांचे आपण काम पाहिले आहे. आपल्या जीवाची परवा न करता इतरांचे प्राण वाचवणाऱ्या अधिकाऱ्यात बाबत नेहमीच कौतुक केले जाते. परंतु काही अधिकाऱ्यांमुळे फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांचे नाव आता एसीबीच्या रडारावर आले आहे. छत्रपती संभाजी नगर मधील गंगापूर तालुक्यातील नारायणपूर येथे पेट्रोल पंपाकरिता आवश्यक असलेल्या फायर ब्रिगेडच्या न हरकत प्रमाणपत्र करिता अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी आणि अग्निशमन विमोचक यांना सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर यांनी अटक केली आहे. रायबा भगवान पाटील (59 वय) मुख्य अग्निशमन अधिकारी, वैभव विजयराव बाकडे (38 वय) प्रमुख अग्निशमन विमोचक असे ताब्यात घेण्यात आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची नावे आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे नारायणपूर बु, ता गंगापूर, जि छत्रपती संभाजीनगर येथील नियोजित पेट्रोल पंपाकरिता आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी प्रमुख अग्निशमन विमोचक बाकडे यांनी 10 हजार रुपयांची लाच मागणी होती. ताडजोडीअंती मुख्य अग्निशमन अधिकारी पाटील यांनी 7 हजार रुपये लाच रक्कम देण्यास सांगितले. तक्रारदार यांचेकडून अग्निशमन अधिकारी बाकडे यांनी 7 हजार रुपये लाच पंच साक्षीदारा समक्ष लाच रक्कम स्वीकारताना एसीबीने त्यांना ताब्यात घेण्यात आहे. वेदांत नगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबी पथक. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,सुरेश नाईकनवरे पोलीस उप अधिक्षक ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी अमोल धस पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर,सापळा सहाय्यक अधिकारी- केशव दिंडे, पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि छत्रपती संभाजी नगर सापळा पथक पोलीस अंमलदार युवराज हिवाळे ला. प्र. वि.छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…