छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कारवाई ; उप विभागीय अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

•छत्रपती संभाजी नगर : जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या उपविभागीय अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याला पेट्रोल पंपाच्या न हरकत प्रमाणपत्रासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
छत्रपती संभाजीनगर :- जागतिक बँक प्रकल्प विभागाचा0उपविभागीय अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याला लाच मागतिल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. पेट्रोल पंपाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी 50 हजारांच्या लाचेची मागणी आरोपींनी केली होती. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.उपविभागीय अभियंता एम.एम. आजमी आणि कनिष्ठ अभियंता वसीम देशमुख असे लाचखोर अधिकाऱ्यांचे नावे आहेत.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदाराच्या आईच्या नावाने चापानेर (ता. कन्नड) येथे पेट्रोलपंप मंजूर झाला होता. या पेट्रोल पंपांच्या ना हरकत प्रमाणपत्राचा प्रस्ताव हा कार्यकारी अभियंता कार्यालय, जागतिक बँक प्रकल्प विभाग, स्नेहनगर येथे प्रलंबित होता. तो मंजूर करण्यासाठी उपविभागीय अभियंता एम.एम. आजमी आणि कनिष्ठ अभियंता वसीम देशमुख यांनी लाच मागितली.या प्रकरणी 22 एप्रिलला तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पथकाने तक्रारीची पडताळणी 22 एप्रील आणि 24 एप्रीलला केली असता संशयित आरोपी वसीम देशमुखने 50 हजारांच्या लाचेची मागणी करीत तडजोडीअंती 40 हजार घेण्याचे मान्य केले होते.तसेच संशयित आरोपी आजमी याने देशमुखला यासाठी उद्युक्त केल्याचे दिसून आले. पथकाने 25 एप्रिल आणि 27 एप्रिलला कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात सापळा लावला होता; मात्र आरोपींना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नव्हती.या प्रकरणी पथकाने दोन्ही आरोपींना लाच मागितल्या प्रकरणी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, वाल्मीक कोरे, दिलीप साबळे, चैनसिंग घुसिंगे, राजेंद्र जोशी, भीमराज जिवडे आणि अनवेज शेख यांनी केली.



