Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव वेगाने जात असलेल्या स्कॉर्पिओ चालकाने दुसऱ्या गाडीला धडक दिली. आरोपी चालकाकडे परवानाही नव्हता.
छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजी नगरमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात Chhatrapati Sambhajinagar Drink And Drive Accident चौघांना जीव गमवावा लागला. येथे दोन वाहनांच्या भीषण धडकेत चार जणांना जीव गमवावा लागला. दरम्यान, दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सात वर्षांची मुलगी आणि दीड महिन्याच्या नवजात बालकाचाही समावेश आहे.
अमरावतीहून पुण्याकडे जाणाऱ्या एका कुटुंबाच्या कारला मद्यधुंद स्कॉर्पिओ चालकाने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की समोरील कारचा चक्काचूर झाला आणि त्यात बसलेले सर्वजण गंभीर जखमी झाले.यामध्ये दीड महिन्याच्या बाळासह चौघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दोन गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांची नावे
मृणालिनी बेसरकर (38 वर्ष), आशालता पोपळघरे (65 वर्ष), दुर्गा सागर गीते (7 वर्ष) आणि नवजात अर्भक अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, अजय बेसरकर (40 वर्ष) आणि शुभांगिनी गीते (35 वर्ष) अशी जखमींची नावे आहेत.
स्कॉर्पिओ चालवणारी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होती आणि त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कुटुंबासोबत हा अपघात झाला ते मूळ अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे कुटुंब अमरावतीहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाटेत हा भीषण अपघात झाला.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…