छत्रपती संभाजीनगरमध्ये हृदयद्रावक घटना; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलाने गमावले प्राण,आईने मोबाईल देण्यास नकार दिल्याने टोकाचे पाऊल
छत्रपती संभाजीनगर :- शहरातील वाळूज एमआयडीसी परिसरातील खावडा येथे एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. Chhatrapati Sambhaji Nagar Suicide News मोबाईल न मिळाल्याच्या रागातून एका 16 वर्षीय मुलाने खावडा डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत मुलगा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील रहिवासी होता. सध्या तो वाळूज येथील स्वास्तिक सिटी, साजापूर शिवार येथे राहत होता आणि पोलीस भरतीची तयारी करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने आपल्या आईकडे मोबाईल फोन मागितला, मात्र आईने त्याला नकार दिला. यामुळे संतापलेल्या मुलाने तिसगाव येथील खावडा डोंगरावरून खाली उडी घेतली. ही घटना पाहून परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमी अवस्थेत त्याला अतुल आडे आणि स्वप्नील पवार यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे MIDC Police Station पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…