महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar Fire : संभाजीनगर येथे भीषण आग, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

•Chhatrapati Sambhaji Nagar Fire संभाजीनगर येथे एका कपड्याचे दुकान असल्याने आग सर्वत्र पसरली असून पाच जणांचा जळाल्याने आणि गुदमरून दोघांचा मृत्यू झाला.

छत्रपती संभाजीनगर :- संभाजीनगर येथे मंगळवारी (२ एप्रिल) सकाळी भीषण अपघात झाला. येथे भीषण आग लागून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अस्लम दर्जी नावाच्या दुकानात ही आग लागली. पहाटे तीन ते चारच्या दरम्यान आग लागली. असे सांगितले जात आहे की, येथे बॅटरी असलेले वाहन चार्जिंगला लावले होते आणि त्यात स्फोट झाल्यानंतर ही भीषण आग लागली.

हे कपड्याचे दुकान असल्याने आग सर्वत्र पसरली आणि दोन जण भाजले तर गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला. असीम वसीम शेख, परी वसीम शेख, वसीम शेख (30 वर्षे), तनवीर वसीम (23 वर्षे), हमीदा बेगम (50 वर्षे), शेख सोहेल (35 वर्षे), रेश्मा शेख (22 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बाहेर इलेक्ट्रिक गाडी चार्जिंगला लावलेली होती. त्या गाडीमध्ये स्फोट झाला. त्यानंतर दुकानाला आग लागली. साडेतीन वाजेच्या सुमारास आग लागली, तेव्हा अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. मात्र, अग्निशमन दल आणि पोलीस योग्य वेळेत पोहचू शकले नसल्याचा आरोप देखील नागरिकांनी केलाय. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago