Chhatrapati Sambhaji nagar Bribe News : लाचखोर सह दुय्यम निबंधक यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhaji nagar Bribe News : सह दुय्यम निबंधक यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक, लाचखोर अधिकाऱ्याच्या घरी लाखोचे घबाड, पत्नीवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर :- सह दुय्यम निबंधक सिल्लोड यांना पाच हजार ची लाच घेताना लाचलुचपात प्रतिबंध Anti Corruption Arrested Deputy Registrar with Bribe विभाग यांनी रंगेहाथ पकडले. सह दुय्यम निबंधक छगन उत्तमराव पाटील (49 वर्ष), आणि त्यांच्या साथीदार भीमराव किसन खरात (58 वर्ष) यांना पाच हजाराची लाच घेताना अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सह दुय्यम निबंधक यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातून एक कोटी 80 लाख 80 हजार 155 रुपये एवढी अनामत संपत्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला आढळून आली होती. या प्रकरणात सह निबंधक यांच्या पत्नीवर वर मालमत्ता संपादित करण्यासाठी सहाय्य केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सह दुय्यम निबंधकाच्या पत्नीवर गुन्हा दाखल..
छगन पाटील यांनी भ्रष्ट आणि गैर मार्गाने उत्पादनापेक्षाही अधिक किमतीची मोहमाया गोळा केली होती. एसीबीच्या कारवाईमध्ये त्यांची संपत्ती एक कोटी 80 लाख 80 हजार 155 इतकी असून ती एकूण 284.45 टक्के सर्वसामान्य उत्पादनापेक्षा अधिक असल्याने एसीबीने कारवाई केली आहे. त्यांच्या पत्नी वंदना छगन पाटील यांच्या विरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात कलम 13 (1), (ब) (2) भ्रष्ट प्रतिबंधक अधिनियमन 1988 सह 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने भ्रष्ट पतीच्या मालमत्तेत वाढ करण्याकरिता सहकार्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. Anti Corruption Bureau News
एसीबी कारवाई
या संपूर्ण प्रकरणात छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे,अपर पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर मुकुंद आघाव, या संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिकारी म्हणून पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग संभाजीनगर संगीता पाटील यांनी केला असून मंत्रालयाच्या अवर सचिव महसूल व वने विभागाने यांनी सदर बेनामी संपत्तीवर कारवाई बाबतचे निर्देश दिले असून, दुय्यम निबंधक यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Anti Corruption Arrested Deputy Registrar with Bribe