मुंबई

Chhagan Bhujbal : आरक्षणावर शरद पवार यांची भूमिका स्पष्ट नाही? राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री छगन भुजबळ यांचा आरोप, ओबीसी नेत्यांचेही तेच म्हणणे

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान रॅलीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचा शरद पवार यांच्यावर आरोप, ओबीसी नेत्यांचेही भुजबळांच्या आरोपांना समर्थन

मुंबई :- रविवारी (14 जुलै) बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आयोजित केलेल्या जनसन्मान रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी शरद पवार यांच्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून केलेले आरोपावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ओबीसी नेत्यांनी यांच्या वक्तव्यावर पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने Babanrao Madne यांनी गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आरक्षणासंदर्भात विविध मुद्दे मांडले आहे अनेक वेळा ओबीसी समनार्थ आंदोलन केले आहे.

राज्यात कधी नव्हे तो टोकाचा वाद मराठा ,ओबीसी, धनगर,आरक्षणामुळे पेटला असताना शरद पवार यांनी बघ्याची भूमिका घेवून राजकिय फायदा उचलण्यासाठी जर पाठीमागून राजकारण करीत असतील तर फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल ; बबनराव मदने, ओबीसी विभाग अध्यक्ष, (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट )मुंबई

मराठा ,ओबीसी, धनगर बांधवानो आपन समजून घ्या याच शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी पहिल्यांदा राज्यात लागू केल्या त्यामुळे पवार साहेब ओबीसी समाज आपल्याकडे शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा जपणारा नेता म्हणून आपल्याकडे पाहत आला आहे.

आणि आज राज्यात ओबीसी मराठा आरक्षण वाद पेटत असताना आपली भूमिका आपन स्पष्ट मांडली पाहिजे
आणि आज मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागत आहे.ओबीसी समाजाच्या वाट्याला येणारे 19% आरक्षण मध्ये ओबीसी समाजाच्या जवळपास 375 पेक्षा जास्त जाती येतात आणि ओबीसी समाजात भीतीचे आणि संभ्रम पसरविणारे वातावरण राज्यात असताना यावर सविस्तर चर्चा करुन कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी जर सर्व पक्षीय बैठक महायुतीच्या सरकारने बोलवली असता बारामती मधून फोन जावून जर विरोधकांनी मिटिंग जावू नये असे जर सांगण्यात येत असेल तर शरद पवार साहेब आपल्याला जाणता राजा म्हणून राज्यातील जनता पाहते असं जर असेल तर साहेब फार मोठे दुर्दैव आहे आपल्याकडून मराठा आणि ओबीसी समाजाच्या या अपेक्षा नाहीत.

“पवार साहेब आपले राजकारण कधीच कोणाला कळत नाही म्हणतात परंतू असले घातकी राजकारण करुन आपन काय साध्य करणार आहात ? याच घातकी राजकिय खेळीचा शिकार धनगर समाज देखिल झाला.राज्यातील मराठा समाजा नंतर दोन नंबर ची लोकसंख्या राज्यात धनगर समाजाची आहे .हे सर्व ओळखून आपन धनगर समाज ST मध्ये घटनेत असताना आपल्याच राजकिय खेळी मुळे आज पर्यंत धनगर समाजाला‌ घटणेतील ST आरक्षण पासून वंचित राहवे लागले आहे. हे देखिल वास्तव सत्य आहे.शरद पवार यांनी जबरदस्त खेळी करुन OBC मध्ये वेगळा प्रवर्ग करुन N T मध्ये राज्यात धनगर समाजाला आरक्षण देवून फसवले धनगर समाज घटणेत ST देशात OBC आणि राज्यात दाखला N T हि अवस्था राज्यातील मराठा समाजानंतर सर्वात मोठ्या समाजाची करुन कित्येक पिढ्या बर्बाद केल्या धनगर समाजाचा राज्यात फक्त राजकीय फायदा उचलून राजकारण करीत राहिले धनगर समाजाला ST आरक्षण आपल्याच खेळी मुळे आज पर्यंत मिळू शकले नाही.
हे वास्तव आहे

राज्यात मराठा ,ओबीसी, धनगर आरक्षण वाद संपूर्ण राज्यात पेट घेतला असताना कसलं राजकारण करतायत कधीतरी राजकारण सोडून विचार कराल की नाही ?

राज्यातील जनते मध्ये जातीवाद पेट घेत असताना आपन अजून ही स्वार्थीपणाचे किती काळ राजकारण करणार आहोत.राज्याच्या विकासामध्ये आपले निश्चित फार मोठे योगदान असेल‌हे कोणी नाकारत नाही.परंतू राज्यातील जनतेने देखिल आपल्याला खूप काही दिले नेहमीच आपल्याला साथ दिली आहे.परंतू शरद पवार यांनी आज राज्यातील मराठा, ओबीसी, धनगर आरक्षण वाद पेटत असताना याचे राजकारण करुन कदाचित आपल्याला राजकीय फायदा होवू देखिल शकेल ? परंतु जी आग राज्यात लागेल ती आग कित्येक पिढ्या विझणार नाही.याची फार मोठी किंमत आपल्या राज्याला चुकवावी लागेल.आपल्या राज्याची शाहू ,फुले , आंबेडकर पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपली ओळख आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला हे परवडणारे नाही.हे राजकीय नेत्यांनी कदापि विसरु नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0