Mumbai Drugs News : दुबईत बसून भारतात ‘ड्रग्सचा साम्राज्य’ उभारणारा मो. सलीम शेवटी गजाआड!

Mumbai Latest Drug Racket : २५६ कोटींच्या मेफेड्रॉन प्रकरणात मोठी कामगिरी — कक्ष ७ च्या पोलिसांचा दुबई ते घाटकोपरपर्यंत थरारक सापळा!
मुंबई – दुबईत बसून भारतात ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) या घातक अंमली पदार्थाची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या मो. सलीम मो. सुहेल शेख या ‘ड्रग्सच्या डॉन’ला अखेर मुंबई पोलिसांनी गजाआड केले आहे. Mumbai Drug News
या अंमली पदार्थ साम्राज्याने देशभर हादरे दिले असताना, कक्ष-७, गुन्हे प्रकटीकरण शाखा, घाटकोपर, मुंबई यांनी अवघ्या काही महिन्यांच्या तांत्रिक तपासानंतर दुबई ते सांगलीपर्यंत ‘ड्रग्स नेटवर्क’ मोडीत काढत थरारक कारवाई केली. Mumbai Police Latest Crime News
२५६ कोटींचा मेफेड्रॉन, करोडोंची रोकड, सोन्याचे दागिने आणि आलिशान गाड्या जप्त!
या गुन्ह्यातून आतापर्यंत पोलिसांनी तब्बल
● १२६.१४१ किलो मेफेड्रॉन (किंमत ₹२५२ कोटी २८ लाख)
● रोकड ₹४ कोटी १९ लाख
● सोन्याचे दागिने ₹१.५ लाख
● स्कोडा कार ₹१० लाख, मोटारसायकल ₹५०,०००
● अंमली पदार्थ तयार करण्याचे साहित्य
अशी एकूण ₹२५६ कोटी ४९ लाख ९६ हजार ६२० रुपयांची अवैध संपत्ती हस्तगत केली आहे!
दुबईहून ‘ड्रग्सचा धंदा’ — मुंबईत हस्तकांच्या माध्यमातून कारखाने!
तपासात उघड झाले की मो. सलीम शेख हा दुबईत वास्तव्यास राहून भारतामध्ये स्वतःच्या हस्तकांमार्फत मेफेड्रॉनचे कारखाने चालवत होता.
या माध्यमातून देशभरात ड्रग्सचा पुरवठा केला जात होता.
त्याचे मुंबईतील ‘हस्तक’ साजीद उर्फ डॅब्ज यास अटक करून त्याच्या मिरा रोड येथील घरातून ३ किलो एम.डी. आणि ३.६८ लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली.
याच नेटवर्कचा मागोवा घेत सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ पोलीस ठाणे हद्दीत इरळी गावात पोलिसांनी २५ मार्च २०२४ रोजी धडक कारवाई करत एक मेफेड्रॉन बनविणारा कारखाना उद्ध्वस्त केला.
तेथे तब्बल १२२.५ किलो मेफेड्रॉन (किंमत ₹२४५ कोटी) तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने व साहित्य जप्त करण्यात आले.
दुबईत अटक, भारतात प्रत्यर्पण — पोलिसांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठी कामगिरी!
या गुन्ह्याशी संबंधित पाहिजे आरोपी मो. सलीम मो. सुहेल शेख याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
यूएई (UAE) पोलिसांनी काही आठवड्यांपूर्वी त्यास अटक केली. त्यानंतर भारतीय पोलिसांनी सिस्टर एजन्सीजच्या मदतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला भारतात आणले.
२२ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यास मुंबईत अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कक्ष ७ चा पराक्रम — दुबई ते सांगली ‘ड्रग्स साम्राज्या’चा अंत!
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे,
उप आयुक्त (प्रकटीकरण-१) विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-पूर्व) चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-७, घाटकोपर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या पथकाने पार पाडली.
या धाडसी पथकात स.पो.नि. धनाजी साठे, पो.उ.नि. स्वप्निल काळे, पो.उ.नि. महेश शेलार, पो.उ.नि. सावंत, आणि पोलीस कर्मचारी कांबळे, राऊत, होनमाने, राठोड यांचा समावेश होता.
“दुबईत बसून भारतात विष पसरवणाऱ्या ‘ड्रग्स डॉन’चा खेळ अखेर संपला!
मुंबई पोलिसांच्या ‘कक्ष ७’ने केवळ ड्रग्सच नाही तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगिरीच्या मुळावर घाव घातला आहे!”


