मुंबई

Chhagan Bhujbal Passport Case : ईडीच्या आगीत पारपत्राचे नुकसान, छगन भुजबळांना न्यायालयाचा दिलासा!

Chhagan Bhujbal Passport Case : नवीन पासपोर्ट आणि व्हिसा मिळण्यात विलंबामुळे प्रवासात अडथळा

मुंबई, | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या परदेश प्रवासाला अखेर न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. Chhagan Bhujbal Passport Case सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात एप्रिल महिन्यात लागलेल्या आगीत त्यांच्या पारपत्राचे नुकसान झाल्यानंतर निर्माण झालेली अडचण आता दूर झाली असून, विशेष न्यायालयाने त्यांच्या परदेश प्रवासासाठी दिलेली परवानगी 12 जूनपर्यंत वाढवली आहे.

27 एप्रिल रोजी मुंबईतील ‘कैसर-ए-हिंद’ इमारतीत लागलेल्या भीषण आगीत ईडी कार्यालयात अनेक महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. यामध्ये भुजबळ यांचे पारपत्र देखील नष्ट झाले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना जरी पारपत्र परत करण्यात आले, तरी ते भिजलेले आणि फाटलेले असल्यामुळे परदेश प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

परदेश प्रवासासाठी परवानगीच्या मुदतीत वाढ

भुजबळ यांनी तत्काळ नवीन पारपत्रासाठी अर्ज केला होता. परंतु, नवीन पासपोर्ट मिळण्यास उशीर झाला आणि त्याअगोदरच नियोजित प्रवासाची तारीख (24 मे) जवळ येऊन ठेपली होती. अखेर 22 मे रोजी त्यांना व्हिसा मिळाला जो 28 मेपासून वैध होता. त्यामुळे नियोजित तारखांना प्रवास करणे शक्य झाले नाही.

छगन भुजबळ यांनी ही माहिती न्यायालयासमोर मांडून प्रवासाच्या कालावधीमध्ये वाढ करण्याची विनंती केली होती. यावर सुनावणी घेत विशेष न्यायालयाने भुजबळ पिता-पुत्रांना दिलासा देत 12 जूनपर्यंतची मुदतवाढ मंजूर केली.

या संपूर्ण प्रकरणामुळे सरकारी कागदपत्रांचे संरक्षण आणि महत्त्वाच्या पुराव्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, अशा घटनांमुळे राजकीय व प्रशासकीय कामकाजावरही परिणाम होऊ शकतो, हे या घटनेतून अधोरेखित होते.

vivek

Recent Posts