Mumbai Job Fraud : परदेशातील नोकरीचा देखावा! – नागपाडा येथे 9 बेकायदेशीर एजन्सी उघड; गुन्हे शाखा आणि ‘प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्स’ची संयुक्त कारवाई

Mumbai Job Fraud News : विदेश मंत्रालयाचा परवाना नसताना फसवणूक; 238 भारतीय पासपोर्ट जप्त; नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळले
मुंबई :- मुंबईतील नागपाडा परिसरात ‘टुर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी’च्या नावाखाली परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून भारतीय नागरिकांची राजरोसपणे फसवणूक करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेने जबरदस्त कारवाई केली आहे. विदेश मंत्रालयाच्या ‘प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्स’ यांच्यासोबत गुन्हे शाखेच्या कक्ष-1 Mumbai Crime Unit 1 ने संयुक्तपणे ही मोहीम राबवत 9 बेकायदेशीर आस्थापनांवर छापे टाकले. Mumbai Latest Crime News
या एजन्सीकडे भारतीय नागरिकांना विदेशात नोकरीसाठी पाठवण्यासाठी आवश्यक असलेला विदेश मंत्रालय, दिल्ली यांचा वैध परवाना नव्हता. तरीही त्या परदेशात जाणाऱ्या इच्छुक लोकांकडून बेकायदेशीररित्या पैसे स्वीकारून त्यांची फसवणूक करत होत्या. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दिनांक 3 डिसेंबर रोजी नागपाडा येथील के. डी. शॉपिंग सेंटर येथे इमिग्रेशन ॲक्ट अंतर्गत संयुक्त छापा टाकण्यात आला. Mumbai Breaking News
या कारवाई दरम्यान, संयुक्त पथकाने फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले मोठे साहित्य जप्त केले. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे, एकूण 238 भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आले. यासोबतच रोजगार ऑफर लेटर, लॉगबुक, रबर स्टॅम्प आणि परदेशी रोजगारासाठी वापरण्यात येणारे फॉर्म व इतर कागदपत्रे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली.
या बेकायदेशीर कृत्याबद्दल नागपाडा पोलीस ठाण्यात Nagpada Police News भारतीय न्याय संहिता आणि इमिग्रेशन ॲक्ट 1983 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.



