Chhagan Bhujbal : कोकाटे प्रकरणात कृषी खाते चर्चेत असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचा दावा
नाशिक | विधिमंडळात ‘रमी’ खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची खात्यातून उचलबांगडी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपसोबत सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला कृषिमंत्रिपद स्वीकारण्यासाठी आग्रह केला होता, असा दावा भुजबळ यांनी केला आहे.
नाशिक येथे माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “आम्ही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी झालो, तेव्हा अजितदादांनी अर्थ खाते घेतले. त्यानंतर त्यांनी माझ्यासमोर अनेक खाती ठेवली आणि तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, असे सांगितले. त्यावेळी त्यांनी मला कृषी खाते घेण्यासाठी खूप आग्रह केला होता.” मात्र, आपण हे पद स्वीकारण्यास नकार दिल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
“मी अजित पवारांना सांगितले की, माझे राजकारण मुंबईत झाले आहे. आम्ही शेतकरी प्रश्नावर नेहमीच उभे असतो, पण त्याची बारीकसारीक माहिती ग्रामीण भागातील लोकांना असते. त्यामुळे हे खाते ग्रामीण भागातील व्यक्तीलाच द्यावे,” असे भुजबळ यांनी सांगितले. आता नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे या पदाला योग्य न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भरणे ग्रामीण भागातून असल्याने ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अधिक चांगली जाण ठेवतात, असे भुजबळ यांनी म्हटले.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…