Chetan Patil : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी, चेतन पाटील यांना हायकोर्टाने जामीन मंजूर
Chetan Patil Shivaji Maharaj Statue : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला जामीन मंजूर झाला आहे.
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चेतन पाटील याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.पुतळा बनवण्यासाठी चेतन पाटील सल्लागार होते. Chetan Patil Shivaji Maharaj Statue ऑगस्ट महिन्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. यानंतर बराच गदारोळ झाला. चेतनला ऑगस्ट महिन्यातच अटक करण्यात आली होती.
चेतनला 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. चेतन पाटील याला 30 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती. 26 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा योद्ध्याचा 35 फूट उंचीचा पुतळा कोसळला होता. या घटनेच्या सुमारे नऊ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनी त्याचे अनावरण केले होते.
चेतन पाटील यांची पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने त्यांचा या प्रकरणात सहभाग नसल्याचे न्यायमूर्ती ए.एस. किल्लर यांच्या एकल खंडपीठाने गुरुवारी सांगितले. चेतन पाटील यांनी केवळ पुतळ्याच्या पायाचा संरचनात्मक स्थिरता अहवाल सादर केला होता, तो पुतळा पडल्यानंतरही शाबूत होता.शिल्पकार आणि कंत्राटदार असलेल्या जयदीप आपटे या आणखी एका आरोपीच्या जामीन अर्जावर 25 नोव्हेंबर रोजी कोर्टात सुनावणी होणार आहे.
सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा ३५ फुटी पुतळा कोसळला होता. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या घटनेनंतर ठेकेदार आणि बांधकाम कंपनीच्या मालकावर एफआयआर दाखल करण्यात आला. पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी पक्षावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला.पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी पक्षावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. ऑगस्ट महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असताना हा पुतळा कोसळला होता. पावसाचा प्रभाव या पुतळ्याला सहन न झाल्याने तो कोसळला.