Chembur Breaking News : चेंबूरच्या जिजामाता जंक्शन जवळ दोन बंदूक आणि आठ काडतुसे जप्त; एकाला अटक

RCF Police Seized Man With Gun : आर सी एफ पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे
मुंबई :- जिजामाता जंक्शन माहुल रोड चेंबूर येथे बंदूक आणि काडतूसे विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या एकाला आरसीएफ पोलीसांनी जेरबंद केले आहे. RCF Police Seized Man With Gun त्यांच्याकडून दोन देशी बंदूक आणि आठ काडतूसे जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.Chembur Latest Crime News
आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत परिमंडळ 6 अमली पदार्थ विरोधी विशेष पथक खंदारे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे आरसीएफ पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्वे आणि त्यांच्या पथकाने जिजामाता जंक्शन माहुल रोड चेंबूर येथे सापळा रचून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीची अंगझाडती घेतली असता आरोपीकडे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे असा मुद्देपाल आढळला आहे.अंगत सिंह श्रीराम गोपाल जावय, (वय 29,रा. ता. जि. इटावा, राज्य उत्तरप्रदेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या विरोधात आरसीएफ पोलीस ठाण्यात कलम 3,25 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 सह 37 (1), (अ), 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्वे करीत आहेत.

पोलीस पथक
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर,विशेष पोलीस आयुक्त, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त, सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मुंबई डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-6, मुंबई, नवनाथ ढवळे, सहायक पोलीस आयुक्त, ट्रॉम्बे विभाग राजेश बाबशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आर सी एफ पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार गाठे यांचे नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, पोलीस शिपाई कंदार, राउत, माळवे, सानप व आर सी एफ पोलीस ठाणे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सहाय्यक फौजदार वाणी, पोलीस हवालदार खैरे व येळे यांनी केली.