छत्रपती संभाजी नगरक्राईम न्यूज

Chatrapati Shivaji Nagar News : 2 कोटी द्या आणि मुलाला घेऊन जा… पोलिसांनी 18 तासात शोध, 7 वर्षाच्या मुलाचे अपहरण!

Chatrapati Shivaji Nagar Kidnapping News : छत्रपती संभाजीनगर येथील एन-4 परिसरात बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्य तुपे हा घराबाहेर सायकल वरून जात होता. दरम्यान, काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्याची सायकल टाकून त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि मुलाचे अपहरण केले

छत्रपती संभाजीनगर :- छत्रपती संभाजीनगरमध्ये सात वर्षीय चैतन्य तुपे याचे अपहरण करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी अवघ्या 18 तासांत मुलाला सुखरूप सुटका केली आणि चार आरोपींना अटक केली. Chatrapati Shivaji Nagar Kidnapping News पोलिसांनी कारवाई करत 18 तासांत आरोपींकडून मुलाला ताब्यात घेतले. 30 अधिकारी आणि 120 पोलिसांचे पथक शहरातील विविध भागात पाठवण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील एन-4 परिसरात बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा मुलगा चैतन्य तुपे हा घराबाहेर सायकल वरून जात होता. दरम्यान, काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्याची सायकल टाकून त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि तेथून पळ काढला. अवघ्या 15 ते 20 मिनिटांत सुनील तुपे यांना फोन करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. फुटेजमध्ये अपहरणकर्त्यांची कार कैद झाली, त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. 30 अधिकारी आणि 120 पोलिसांचे पथक शहरातील विविध भागात पाठवण्यात आले आहे.

स्वत: पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे 18 तास सतत या कारवाईत होते. पोलिसांची तत्पर कारवाई आणि प्रयत्नांमुळे मुलाची सुखरूप सुटका झाली आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या प्रकरणी पोलिसांनी जखमी आरोपीसह एकूण चार आरोपींना अटक केली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याशिवाय अन्य तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे एका निरपराध व्यक्तीचे प्राण वाचले आणि गुन्हेगार पकडले गेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0