ठाणेमुंबई
Trending

Sada Sarvankar : राज ठाकरेंशी आमचं नातं जिव्हाळ्याचं’; सदा सरवणकर यांनी स्पष्ट केल्या राजकीय संबंधातील कटुतेच्या चर्चा

Sada Sarvankar On Raj Thackeray : ‘मी आमदार नसतानाही 20 कोटींची कामं करतोय,’ निधीच्या दाव्यावरून उडालेल्या वादावर सरवणकरांचे स्पष्टीकरण

मुंबई :- शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर sada Sarvankar यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्यासोबतच्या त्यांच्या संबंधांबाबत जाहीरपणे भाष्य केले आहे. आज शिवाजी पार्क जिमखान्याच्या नव्या वास्तूच्या उद्घाटनावेळी बोलताना सरवणकर यांनी राज ठाकरेंशी आपले जुने आणि जिव्हाळ्याचे नाते असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या राजकारणामुळे नात्यात कटुता येत नाही, असे सांगत त्यांनी दोन्ही पक्षांमधील संबंधांवर स्पष्टीकरण दिले.

राज ठाकरेंशी जुन्या नात्याची आठवण

दादर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांच्या विरोधात सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवली होती. या कारणामुळे दोघांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, आजच्या कार्यक्रमात सदा सरवणकर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. “मी राज ठाकरेंचा पदस्पर्श केला. त्यांनीही माझ्या पाठीवर थाप मारली. बाळासाहेब ठाकरे असतानापासून आमचे राज साहेबांशी खूप जुने नाते आहे. आज आम्ही शेजारी आहोत. निवडणूक हा एक वेगळा विषय आहे, पण आमचं नातं जिव्हाळ्याचं आहे,” असे सांगत त्यांनी राज ठाकरेंबद्दल नितांत आदर व्यक्त केला.

निधीवरून केलेल्या विधानावर स्पष्टीकरण

यावेळी त्यांनी नुकत्याच वादग्रस्त ठरलेल्या ’20 कोटी रुपयांच्या निधी’च्या विधानावरही स्पष्टीकरण दिले. ‘आमदार नसतानाही मला 20 कोटी रुपयांचा निधी मिळाला,’ या त्यांच्या विधानावर टीका झाली होती. त्यावर सदा सरवणकर म्हणाले, “शेजारच्या कॅरम स्पर्धेसाठी काही लोक एका आमदाराकडे गेले होते. तेव्हा त्या आमदाराने ‘मला फक्त 2 कोटी रुपये मिळतात, माझ्याकडे निधी नाही,’ असे सांगितले. त्यावर मी म्हणालो की, मी आमदार नसतानाही 2023-24-25 या कालावधीत मंजूर झालेल्या 20 कोटी रुपयांची कामे आजही शिल्लक आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते सोबत असल्यावर निधीची कमतरता पडत नाही, हेच मला सांगायचे होते.”

त्यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की, ‘काही आमदार फक्त बिल्डरांची कार्यालये किंवा साईटवर दिसतात, त्यामुळे त्यांना मी केलेली कामे दिसणार नाहीत.’ लोकसभेच्या आणि पावसाच्या कामांमुळे काही कामे थांबली होती, पण ती कामे मी आमदार नसतानाही करत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0