ACB Trap News : लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात पिताजी नगरीतून अटक,सिमेंट रस्त्याच्या कामासाठी 12 लाखांची लाचेची मागणी
छत्रपती संभाजीनगर :- शासनाच्या ‘नगर उत्थान अभियान’ अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामासाठी मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी तब्बल 12 लाखांची लाच मागितली, 12 lakh Bribe आणि त्यातील 6 लाखांची रक्कम स्वीकारताना त्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. Chatrapati Sambhaji Nagar ACB Trap News
माजलगाव नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेले चव्हाण यांनी, दोन कोटी रुपयांच्या रस्त्याच्या बिलापोटी तक्रारदाराकडे 6 लाख रुपये आणि उर्वरित अतिक्रमण हटवण्यासाठी पुन्हा 6 लाख अशी एकूण 12 लाख रुपयांची मागणी केली होती.
10 जुलै रोजी तक्रारदार व पंचांच्या समक्ष पडताळणीदरम्यान, चव्हाण यांनी 6 लाख रुपये तत्काळ घेण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार त्याच दिवशी सापळा रचून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी चव्हाण यांना पंचासमक्ष 6 लाख रुपये स्वीकारताना अटक केली.
त्यांच्या अंगझडतीत अँपल कंपनीचा मोबाईल आणि शासकीय ओळखपत्र सापडले असून, मोबाईलची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय आरोपीच्या घराची झडतीही सुरु आहे. माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
माधुरी केदार (कांगणे), पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर, सुरेश नाईकनवरे, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक तथा पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली केशव दिंडे, पोलीस निरीक्षक, सापळा अधिकारी, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, पोलीस हवालदार अशोक नागरगोजे, राजेंद्र सिनकर यांनी कारवाई करत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…