Chatrapati Sambhaji Nagar Bribe Case : 17 गरिबांच्या घरकुल फाईल मंजुरीसाठी लाचेखोर कर्मचाऱ्यांची मागणी
छत्रपती संभाजीनगर / अंबड :- “गरिबांच्या हक्काचं घरकुल मिळवण्यासाठीही आता लाच द्यावी लागते का?” — असा संतप्त सवाल अंबड तालुक्यातील जनतेत उसळला आहे. Chatrapati Sambhaji Nagar Bribe Case अंबड पंचायत समितीचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सचिन कांबळे याने 17 लाभार्थ्यांकडून 65 हजार लाच रक्कम घेताना रंगेहाथ पकडला गेला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिशय नियोजनबद्ध सापळा रचून ही कारवाई केली. Chatrapati Sambhaji Nagar ACB Latest News
काय आहे प्रकरण?
तक्रारदार व त्यांच्या गावातील 17 लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. त्याचा दुसरा हप्ता 70 हजार मंजूर करण्यासाठी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सचिन कांबळे व कंत्राटी ऑपरेटर रामदास मंडाळ यांनी प्रत्येकी पाच हजार च्या दराने एकूण 85 हजार लाच मागितली. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर युनिटकडे कळवली.
सापळ्याची अचूक अंमलबजावणी
तक्रारीची पडताळणी करून विभागाने 31 मे रोजी कारवाई केली. कांबळे याने तक्रारदाराकडून 65 हजार स्वीकारल्यावर लगेचच अटक करण्यात आली. या वेळी त्याच्याकडून मोबाईल, घड्याळ, व ड्रायव्हिंग लायसन्स जप्त करण्यात आले. दुसरा आरोपी रामदास मंडाळ फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
या प्रकरणी भ्र.प्र.का. कलम 7,7(अ), 12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंबड पोलीस ठाण्यात सुरू आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…