Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut : 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणात निवृत्ती घेणार संजय राऊत यांचा दावा
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांच्या निवृत्ती घेणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजपाकडून संजय राऊत यांना निशाणा करण्यात आला आहे. Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत म्हणाले की संजयराव त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्यांना भाजप द्वेषाची कावीळ झाली असल्याचे टीका बावनकुळे यांनी केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी निवृत्ती होणार हे देश ठरवले सकाळचा भोंगा नाही अशी खोचक टीका बावनकुळे यांनी केली आहे.
या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. बावनकुळे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून संजय राऊत यांचा दावा खोडून काढला आहे. त्यासाठी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाचा देखील दाखला दिला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. 75 वर्षे वयानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीवर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, ‘स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केला आहे. तो नियम त्यांना लागू होत नाही का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. त्यांच्या पक्षात 75 वर्ष झाल्यानंतर सत्तेच्या पदावर कोणीही राहू नये, हा त्यांचाच नियम आहे. हा नियम लालकृष्ण अडवाणी, आणि मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेत्यांना लागू केला गेला. या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील या नियमाला मान्यता दिली होती. त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठीच नरेंद्र मोदी संघाच्या मुख्यालयात गेले होते. आगामी 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वर्षे पूर्ण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीवर चर्चा करण्यासाठीच ते संघाच्या मुख्यालयात गेले, असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.’
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…