•कोकणातील राजकारणात मोठी खळबळ; महायुतीतील पक्ष थेट आमनेसामने!
मुंबई :- राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, सर्वाधिक चर्चा कोकणातील राजकारणाची होत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी मालवणमधील एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी थेट स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) केल्याचा दावा.
या स्टिंग ऑपरेशनदरम्यान, संबंधित भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेली एक बॅग आढळून आल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. या संपूर्ण घटनेचे सोशल मीडियावर लाईव्ह प्रसारण देखील त्यांनी केले, ज्यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे आणि भाजप तसेच शिवसेना (शिंदे गट) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) यांची तीव्र नाराजी
या घडामोडींवर भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया देत निलेश राणे यांनाच सुनावले आहे.
‘बेडरूम’चा आक्षेप: बावनकुळे यांनी सवाल केला, “एखाद्याच्या घरात थेट बेडरूमपर्यंत जाऊन अशा प्रकारचं स्टिंग ऑपरेशन करणं योग्य आहे का?” “अशा प्रकारे कोणाच्या घरात जाण्याचा किंवा कोणाच्या बेडरूमपर्यंत जाण्याचा अधिकार आहे का? बेडरूमपर्यंत जाऊन व्हिडीओ शूटिंग करणं हे नियमाच्या बाहेर आहे असं मला वाटतं.”
बावनकुळे म्हणाले की, पैसे कुठून आले? कोणत्या व्यवहारातून आले? याचा तपास पोलीस करतील. तसेच, या प्रकरणात पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करतील.
रोहित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचे कौतुक
याउलट, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी निलेश राणे यांचे जाहीरपणे कौतुक केले आहे.’भाजपाचा खरा चेहरा उघड’: पवार म्हणाले, “निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांचे मनापासून आभार!”
त्यांच्या मते, “सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करुन निवडणुका जिंकायच्या हाच भाजपाच्या विजयाचा ‘फॉर्म्युला’ आहे. यात कोणतीही चाणक्य नीती नाही.”
पवार यांनी भाजपला सल्ला दिला की, “आता मित्रपक्षाच्याच आमदाराने कपडे फाडल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेले आहेत, हे मान्य करावं.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…