महाराष्ट्र

Chandrapur ZP Election : चंद्रपूर पालिकेत राजकीय ‘चमत्कार’! भाजपाच्या संगीता खांडेकर महापौर, तर ईश्वर चिठ्ठीने ठाकरेंचे प्रशांत दानव उपमहापौर

Chandrapur Latest News : एका मताचा विजय आणि ईश्वर चिठ्ठीचा कौल; भाजपा-ठाकरे सेना युतीमुळे काँग्रेसचा ‘गड’ ढासळला; एमआयएमची तटस्थ भूमिका ठरली निर्णायक

चंद्रपूर | चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचा पेच आज अत्यंत नाट्यमय वळणावर संपला. राज्याच्या राजकारणात विळ्या-भोपळ्याचे नाते असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी स्थानिक पातळीवर हातमिळवणी करत काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली आहे. भाजपाच्या संगीता खांडेकर यांची अवघ्या एका मताच्या फरकाने महापौरपदी निवड झाली, तर उपमहापौर पदाचा थरार थेट ‘ईश्वर चिठ्ठी’पर्यंत पोहोचला, ज्यात ठाकरे गटाचे प्रशांत दानव यांनी बाजी मारली.

महापौर निवडणूक: एका मताने फिरवले नशीब

महापौर पदासाठी भाजपाच्या संगीता खांडेकर आणि काँग्रेसचे उमेदवार यांच्यात अटीतटीची लढत झाली.

संगीता खांडेकर (भाजपा): 32 मते

काँग्रेस उमेदवार: 31 मते

वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने बहुमताचा आकडा 33 वर आला होता. मात्र, एमआयएमच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजपाचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.

उपमहापौर निवडणूक: ईश्वर चिठ्ठीने दिला कौल

उपमहापौर पदाची निवडणूक तर त्याहूनही रंजक ठरली. काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे पप्पू देशमुख आणि भाजपा समर्थित ठाकरे गटाचे प्रशांत दानव या दोघांनाही प्रत्येकी 32-32 मते मिळाली. दोन्ही उमेदवारांची मते समान झाल्याने सभागृहात तणाव निर्माण झाला. अखेर नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. नशिबाने साथ दिल्याने या चिठ्ठीत प्रशांत दानव यांचे नाव निघाले आणि त्यांची उपमहापौरपदी वर्णी लागली.

असे जुळले सत्तेचे समीकरण (संख्याबळ – 66 जागा)
भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरे गटाची साथ अत्यंत मोलाची ठरली.

महायुती (भाजपा 23 + शिंदे सेना 1): 24 जागा

ठाकरे गट (6 नगरसेवक + 2 अपक्ष): 08 जागा

एकूण विजयी गट: 32 जागा

दुसरीकडे, काँग्रेसकडे 27 आणि जनविकास सेनेच्या 3 अशा एकूण 30 जागा होत्या. दोन बंडखोर अपक्षांनीही काँग्रेसला साथ दिली, मात्र तरीही हा आकडा 32 वरच थांबला.

राजकीय महत्त्वाची भूमिका

ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांनी मातोश्रीच्या आदेशानुसार भाजपाला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. “एकवेळ विरोधी बाकावर बसू पण भाजपला मदत करणार नाही” असे विधान संजय राऊत यांनी केले असले तरी, चंद्रपुरात मात्र ‘स्थानिक समिकरणां’नी राज्याला मोठा धक्का दिला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago