महाराष्ट्र

Chandrapur News : माणुसकीला काळिमा! 1 लाखाच्या कर्जाचे झाले 74 लाख; चंद्रपुरात हतबल शेतकऱ्यावर किडनी विकण्याची वेळ

Chandrapur Latest News : दिवसाला 10 हजार रुपये व्याज; शेती, ट्रॅक्टर विकूनही सावकाराची भूक शमेना!

चंद्रपूर | चित्रपटातील क्रूर सावकार आपण पडद्यावर पाहिले असतील, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आलेली एक सत्य घटना अंगावर काटा आणणारी आहे. केवळ 1 लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्याला आपली किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवाच्या सव्वा व्याजाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याचे आयुष्य सावकाराने उद्ध्वस्त केले असून, आता न्याय न मिळाल्यास सहकुटुंब जीवन संपवण्याचा इशारा या पीडित कुटुंबाने दिला आहे.

व्याज की लूट?

दिवसाला 10 हजारांचा तगादा पीडित शेतकऱ्याने स्थानिक सावकाराकडून गरजेपोटी 1 लाख रुपये घेतले होते. मात्र, या सावकाराने लावलेला व्याजाचा दर माणुसकीला थक्क करणारा होता. कुटुंबाच्या दाव्यानुसार, सावकार दिवसाला 10,000 रुपये व्याज मागत होता. यामुळे मूळ रक्कम 1 लाख असताना व्याजाचा डोंगर तब्बल 74 लाख रुपयांवर जाऊन पोहोचला.

किडनी विकली, तरीही छळ सुरूच कर्ज फेडण्याच्या विळख्यात अडकलेल्या या शेतकऱ्याने प्रथम आपली दोन एकर शेती विकली, त्यानंतर ट्रॅक्टर आणि घरातील मौल्यवान वस्तूही विकल्या. तरीही सावकाराचा जाच कमी झाला नाही. अखेर हतबल होऊन या शेतकऱ्याने 8 लाख रुपयांना स्वतःची किडनी विकली आणि आलेले पैसे सावकाराला दिले. इतका मोठा त्याग करूनही सावकाराकडून होणारी मानसिक आणि शारीरिक छळवणूक थांबलेली नाही.

कायद्याचे कवच की हतबलता?

भारतात सावकारी पूर्णपणे बेकायदेशीर नसली, तरी ती नियमांच्या अधीन आहे. मात्र, चंद्रपूरच्या या प्रकरणात कायद्याचे उघड उल्लंघन झाले आहे.’युझ्युरियस लोन्स ॲक्ट, 1918′ नुसार न्यायालय अवाजवी व्याज रद्द करू शकते. सावकाराने दमदाटी किंवा धमकी दिल्यास ‘भारतीय न्याय संहिता’ अंतर्गत खंडणी आणि गुन्हेगारी धमकीच्या कलमांखाली 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

प्रशासनाकडून ठोस कारवाईची प्रतीक्षा पीडित शेतकऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली असून सुरुवातीला या प्रकरणात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. आता हा विषय राज्यभर चर्चेत आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. “आम्ही सर्वस्व गमावले आहे, आता फक्त जीव देणे उरले आहे,” अशा शब्दांत शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago