•अपघातग्रस्त रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांचे ठाकरे गटासोबत सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन; सीसीटीव्ही फुटेजची मागणी
पुणे :- नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारने 30 सप्टेंबर 2025 रोजी वडगाव बुद्रुक येथे रिक्षाचालकाला धडक दिल्यामुळे निर्माण झालेला वाद आता चिघळला आहे. अपघातग्रस्त रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गौतमी पाटीलच्या अटकेच्या मागणीसाठी सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर जोरदार आंदोलन केले.
मंत्री चंद्रकांत पाटलांचा पोलीस उपायुक्तांना थेट फोन
अपघातग्रस्त रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी आंदोलन केल्यानंतर भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तातडीने पोलीस उपायुक्तांना फोन केला आणि थेट प्रश्न विचारला, “गौतमी पाटीलला उचलणार की नाही?” अपघातग्रस्त कुटुंबाचा वैद्यकीय खर्च वाढला असून, त्यांना लवकर न्याय देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
‘नोटीस देऊनही गौतमीचे शो सुरू!’
या आंदोलनात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी पोलिसांवर असहकार्याचा आरोप केला. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अपघातप्रसंगी गौतमी पाटील गाडीत नसली तरी गाडी तिच्या नावावर असल्याने तिची जबाबदारी संपत नाही आणि ती सुद्धा आरोपीच आहे.
सीसीटीव्ही फुटेजची मागणी: रिक्षाचालकाच्या मुलीने सांगितले की, सध्या सुरू असलेले प्रकरण केवळ प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवर आधारित आहे. पोलिसांनी अद्याप सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर ठोस पुरावे सादर केलेले नाहीत, ज्यामुळे शंका वाढली आहे.
उपचार खर्च: जखमी रिक्षाचालकाचा रुग्णालयाचा खर्च लाखो रुपयांच्या घरात गेला आहे. पोलीस ३० सप्टेंबरला गौतमीला नोटीस दिल्याचे सांगत असले तरी ती अद्याप पोलीस ठाण्यात हजर झाली नाही, उलट ती राज्यभर शो करत फिरत आहे. हा खर्च कुणी द्यायचा, असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला.
‘साधा संपर्कही नाही’
अपघातग्रस्त रिक्षाचालकाच्या मुलीने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, अपघात झाल्यापासून आतापर्यंत गौतमी पाटीलच्या वतीने आमच्या कुटुंबाशी साधा संपर्कही साधलेला नाही. पोलिसांनी आंदोलन झाल्यावर संवाद साधला असला तरी, जोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज समोर येत नाही, तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…