Chandrahar Patil : प्रसिद्ध कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश
•सांगली येथील प्रसिद्ध कस्तिपट्टू महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश केला
मुंबई :- सांगली येथील सुप्रसिद्ध कुस्तीपटू डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदे सह विरोधी पक्षांवर टीका केली आहे. काल रविवारी (10 मार्च) उद्धव ठाकरे यांचे निकटवर्गीय असलेले आणि जवळचे सहकारी आमदार रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांचे साथ सोडली परंतु डबल महाराष्ट्र केसरी असलेले सांगलीचे पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात आज प्रवेश केला आहे.सांगली लोकसभा मतदार संघातून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत देखील उद्धव ठाकरे यांनी दिले. ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, काही पळकुटे नामर्द लोक निघून गेले परंतु आता शिवसेनेत खरे मर्द येत आहेत, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर देखील जोरदार हल्लाबोल केला. Chandrahar Patil
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेना ही मर्दाची संघटना आहे. पळकुटे नामर्द पळून जात आहेत. पण शिवसेनेत आता मर्द लोक येत असल्याचा मला अभिमान आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज शिवसेनेत आले. त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. चंद्रहार यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की, तुम्ही काही तरी संकेत द्या. त्यामुळे एका पैलवानाला आपल्याला दिल्लीत पाठवायचे आहे, असे म्हटल्यावर चंद्रहार पाटील यांची लोकसभेची उमेदवारी निश्चित असल्याचे संकेत देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिले.ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, सांगलीतून एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. मुळात मी बऱ्याच दिवसांपासून सांगलीत आलेलो नाही. मी सांगलीत येणारच पण तत्पूर्वी महाराष्ट्रात जे गद्दार आहेत त्यांना आता आडवं करायचे आहे. त्यासाठी मी फिरत आहे. येत्या काळात राज्याचे भविष्य तरुणांच्या हाती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये अधिक विश्वास दृढ झाला असेल. एक मात्र विजयाच्या सभेला तुम्ही मला सांगलीत बोलावणार आहात ना? असा सवाल ठाकरे यांनी केला. यावेळी उपस्थित चंद्रहार यांच्या समर्थकांनी हो असा आवाज दिला. त्यानंतर ठाकरे म्हणाले की, मग तुम्हाला विजय मिळवावेच लागणार आहे. Chandrahar Patil