Chandrahar Patil Joined Eknath Shinde Shivsena : नकली आखाड्याचा निरोप घेत चंद्रहार पाटील खऱ्या आखाड्यात
ठाणे | महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात आज मोठा झणझणीत डाव घडला! सांगलीतील प्रखर नेतृत्व चंद्रहार पाटील यांनी अखेर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दणक्यात प्रवेश केला.Chandrahar Patil Joined Eknath Shinde Shivsena गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत हा प्रवेश केवळ औपचारिकता ठरला.
या प्रवेशप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे रोखठोक भाषेत टोले लगावत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “पाटील आता नकली आखाड्यातून असली आखाड्यात आले आहेत. हे हॉल नाही, तर आखाडाच आहे. शिट्ट्या तर वाजणारच,” अशा शब्दांत शिंदेंनी वातावरण तापवलं.
चंद्रहार पाटील यांच्या स्वागतासोबतच शिंदे यांनी टोमणेबाजीच्या राजकारणावर घणाघाती हल्ला चढवला. “ही शिवसेना हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे, टोमणे सम्राटांची नाही,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष इशारा दिला.
वाघाचं कातडं पांघरणाऱ्याला आता ओळख उघडी पडणार!” — शिंदे यांचा बाणेदार हल्ला
पक्षप्रवेशाच्या मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्फोटक भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. “वाघाचं कातडं पांघरलं तरी लांडगा लांडगाच राहतो. ही सेना बाळासाहेबांची आहे, टोमणे झाडणाऱ्यांची नाही,” असं सांगत त्यांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली.
“चंद्रहार पाटील नकली आखाड्यातून आता खऱ्या मैदानात आले आहेत. सांगलीचा पैलवान आता आमचा डबल महाराष्ट्र केसरी ठरणार,” असं शिंदे म्हणाले.
2022 च्या सत्तांतराचे उदाहरण देत शिंदे म्हणाले, “मी कुस्तीपटू नाही, पण राजकारणात अशा डावपेचांनी सर्वांना चीत केलं की, अजून उठलेलेच नाहीत! हे मैदान माझ्यासाठी आखाडा आहे – इथं खेळ नाही, लढा असतो!”
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…