Chakan Police Latest News : कोयत्याने हल्ला करणाऱ्या रजित येरकरला रस्त्यावर उठाबशा करण्याची शिक्षा
चिंचवड :- पिंपरी-चिंचवडच्या चाकण पोलिसांनी Chakan Police Staion परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि स्वतःला ‘भाई’ समजणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराची चक्क बाजारपेठेतून धिंड काढून त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. रजित येरकर (वय अंदाजे 28) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. PCMC Latest News
नेमके काय घडले?
रजित येरकर आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी रिक्षा चालकाला कट मारल्याच्या किरकोळ वादातून कोयत्याने आणि लाठ्या-काठ्यांनी रिक्षा चालक व त्याच्या मित्रावर जीवघेणा हल्ला केला होता. हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी रिक्षा चालकाला मोबाईलमध्ये फोटो काढून धमकावले होते. या प्रकरणी चाकण पोलिसांनी तातडीने रजित येरकर आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. Pune Police News
भर चौकात ‘उठाबशा’
चाकण पोलिसांनी या गुन्हेगाराची ‘भाई’गिरीची मुजोरी मोडून काढण्यासाठी अनोखी पद्धत वापरली. आरोपी रजित येरकरच्या हाताला आणि दंडाला दोरखंड बांधून त्याची चाकणच्या बाजारपेठेतून धिंड काढण्यात आली. इतकेच नव्हे, तर भर चौकात नागरिकांच्या समोर पोलिसांनी त्याला उठाबशा करायला लावल्या. Pune Chakan Police Latest News
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे आणि ‘भाई’गिरी मोडून काढल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडून मोठे कौतुक होत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…